क्राइम

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून

Spread the love

 सोलापूर / प्रतिनिधी

                    एखाद्या तरुणाला कुठली तरुणी आवडू लागली आणि तिने त्याच्यासोबत हसून बोलणे केले की तरुणींच्या प्रेमात पडलेला तरुण या गोष्टीला प्रेम म्हणून घेतो.आणि समोरच्या तरुणी सोबतचे स्वप्न रंगवू लागतो. तो या गोष्टीचा जराही विचार करत नाही की तिला देखील भावना आहेत. होकार आणि नाकाराचा तिला देखील विचार करत नाही. आणि त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम कारायला लागतो.सगळे स्वप्न रंगवल्यावर जर तिने त्यासाठी नकार दिला तर मग हा ‘ तू मेरी नही हुई तो किसी और कि भी होने नही दूंगा ‘ या घृणित विचारने तिची हत्या करतो. अशीच घटना आता सांगोल्यातून समोर आली आहे.सोलापूरमधील सांगोल्यात एका व्यक्तीने एकतर्फी प्रेमात एका तरुणीची हत्या केली. ऋतूजा मदने असं मृत तरुणीचं नाव आहे.

एकतर्फी प्रेमातून तरूणीची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील संशयित आरोपी फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. सोलापुरात घटनेत सांगोला येथील महाविद्यालयीन तरुणी ऋतुजा दादासाहेब मदने हिचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला . एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

संबंधित तरूणी कोळा येथील आहे. या हत्या प्रकरणाची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे करत आहेत. तरुणीची हत्या करणारा आरोपी तरुण सध्या फरार आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close