आपल्या मुलीच्या कबरींना कुलपे लावण्यामागे हे आहे कारण
इस्लामाबाद / नवप्रहार न्यूज नेटवर्क
जगात कुठे ना कुठे अश्या विचित्र घटना घडत असतात की ज्यावर सहसा विश्वास बसत नाही. पण या घटनेमागील सत्यता कळल्यावर मात्र आपण त्यावर विश्वास करायला बाध्य होतो. असाच विचित्र प्रकार शेजारी पाकिस्तान मध्ये घडत आहे. येथील लोकं आपल्या मुलींच्या कबरींना कुलपे लावत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरचं असं होतं आहे काय ? तर होय ही बातमी सत्य आहे आणि त्यामागील कारण हे आहे.
या मागील कारण अत्यंत भयंकर आहे . येथे मय्यात मुलींच्या मृतदेहाला कबरीतून काढून मृतदेहावर बलात्कार अथवा सामूहिक बलात्कार होत आहेत. पाकिस्तानात एरव्ही दर दोन तासांनी एका महिलेवर बलात्कार होतो. मृत महिलांवरील बलात्काराचे प्रकार मात्र या देशाची मान शरमेने खाली घालणारे आहेत. पाकमधील विचारवंत हारिस सुल्तान यांनी या प्रकारांना कट्टरवादी मत प्रवाह जबाबदार असल्याचे म्हटलेले आहे. नेक्रोफिलियाच्या गुन्ह्याचा भयावह प्रकार पाकमध्ये पहिल्यांदा 2011 मध्ये उघडकीला आला होता. कब्रस्तानाची देखरेख करणार्या कराचीतील नॉर्थ निझामाबाद येथील मोहम्मद रिझवान याने त्याच्या नोकरीदरम्यान जवळपास प्रत्येक स्त्री मृतदेहाची कबर उकरून बलात्कार केला होता.
मोहम्मद रिझवान याने स्वत:च 48 महिलांच्या मृतदेहांसोबत बलात्कार केल्याची जाहीर कबुली दिली होती. पाकिस्तानात 40 टक्क्यांवर महिला आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी हिंसेला बळी पडतातच पडतात, असे मानवाधिकार आयोगाचे म्हणणे आहे. मृत्यू सर्व दु:खांतून सुटका करतो म्हणतात; पण पाकिस्तानातील महिलांची मृत्यूनंतरही सुटका नसल्याची स्थिती आहे. मृत मुली तसेच महिलांच्या कबरींवर लोखंडाचे गेट तसेच कुलपे ठोकली जात असली, तरी हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याची परिस्थिती आहे.
डेली टाईम्स’मध्ये याबाबतचे विस्तृत वृत्त छापून आले आहे. मृतांसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याच्या कृत्याला नेक्रोफिलिया असे संबोधले जाते. नेक्रोफिलियाचे अनेक प्रकार या देशात उघडकीला आले आहेत.