‘ यह जमाना अपने को साथ रहने देने वाला नहीं ‘ असे म्हणत कथित प्रेयसीला टाकायला लावली विहिरीत उडी

स्वतः मात्र पळून गेला ; महिलेच्या वडिलांनी केला लव्ह जिहाद चा आरोप
प्रतिनिधी / फुलंब्री
नाशिक येथील TCS कंपनीत घडलेल्या अत्याचार आणि धर्मांतरणाच्या प्रकाराने राज्यता खळबळ माजली असताना छत्रपती शिवाजी नगर च्या फुलंब्री मधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुस्लिम तरुणाने दोन मुलांच्या आईला आपल्या प्रेमात ओढून तिला ‘ यह जमाना अपने को साथ रहने देने वाला नहीं ‘ असे म्हणत विहिरीत उडी टाकायला भाग पडले आहे. स्वतः मात्र पळून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये हा प्रकार घडला आहे. 15 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. समीर खान नजीर खान असं या आरोपीचं नाव आहे. या विकृताने एका 28 वर्षीय विवाहितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. या विवाहितेला २ मुलं होता. ती आपल्या पतीसह मयुर पार्क परिसरात राहत होती. ४ ते ५ महिन्यापूर्वी मयत विवाहितेची ओळख आरोपी समीर खान नजीर खानशी झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मयत विवाहितेनं स्वतःच्या दोन अपत्यांचा आणि नवऱ्या विचार न करता, पतीला सोडून माहेरी फुलंब्री इथं राहण्यासाठी आली. मला माझ्या पतीसोबत राहायचं नाही, नजीर खानसोबत राहायचं, असं आई-वडिलांना सांगितलं. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी मुलीची समजूत काढली. एवढंच नाहीतर आरोपी नजीर खानचीही समजूत काढली होती.
‘तू और हम मर जायेंगे, चल कूद..’
पण, १५ एप्रिलच्या जिवशी आई-वडिल घरात झोपले असताना घराच्या मागच्या बाजूला रात्री नजीर खान हा घरात लपून आला. रात्री १०.३० च्या सुमारास मयत विवाहिता कुठे आढळून येत नव्हती. त्यावेळी आई-वडिलांनी शोध घेतला असता मृत महिलेला नजीर खानसोबत नग्न अवस्थेत घराच्या पाठीमागे आढळले. आई-वडिलांनी आपल्याला पाहिल्यामुळे विवाहित महिला आणि नजीर खान दोघे विहिरीकडे धावले. “तू और हम मर जायेंगे, यह जमाना अपने को साथ नही रहने देगा, चल कुद” असं म्हणून समीर खानने तिला विहिरीत उडी मारायला लावली. तिने विहिरीत उडी मारली. पण समीर खान हा अंडरपॅन्टवरच पळून गेला.
मुलीला वाचवण्यासाठी धावाधाव
हा सगळा प्रकार वडिलांच्या डोळ्या देखत घडला होताा. आपली मुलगी विहिरीत पडल्याचं कळाल्यावर कुटुंबीयांनी विहिरीकडे धाव घेतली. मयत विवाहितेच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला फोन करून बोलावून घेतलं, त्यांनी मुलीला बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न केले, मात्र यश आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. विहिरीतून मयत विवाहितेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्यात याविषयी आरोपी समीर खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नजीर खानला अटक केली आहे. मुलीच्या वडिलांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. आरोपी समीर खान नजीर खान याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.




