वृक्ष संवर्धन संकल्प सिध्दीस नेला . सुजित झावरे पाटील.
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – वृक्ष संवर्धन ही काळा ची व निसर्गाची गरज असून हा संकल्प आपण सर्वांनी सिद्धीस नेला , असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले आहे .
वासूंदे येथे सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतून देवकृपा फाउंडेशन मार्फत वृक्ष दिंडी सोहळा आयोजन करण्यात आला . यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर एक झाड लावून ६०० झाडांची लागवड करण्याचा आगळा वेगळा संकल्प करण्यात आला. गावातील शाळा परिसर, स्मशान भूमी परिसर, दशक्रिया विधी परिसर, गावातील असलेल्या रस्त्याच्या बाजूला अश्या प्रकारे गावामध्ये १००० पेक्षा जास्त झाडे लागवड करून जतन करण्याचे गावातील ग्रामस्थांनी ही संकल्प केला.
समाजासाठी वृक्षांचे महत्व घोषणेतून तसेच फलक लेखनातून सांगितले. दिंडी ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझीम पथकांच्या तालामध्ये टाळ मृदुंगांच्या तालामध्ये झाडे लावा, झाडे जगवा, घरोघरी झाडे लावून, चला तर मग झाडे लावूया, सजीव वाचवूया चे फलक घेवून गावातून फेरी काढण्यात आली. गावातील मारुती मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी एकत्रित येत लेझीम पथक आणि टाळकऱ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला.
दिंडीत विठ्ठल रुक्मिणी, संत वेषभूषेत मुले टाळकरी व विणेकरी अशा पारंपरिक वेशभूषेत मुले दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी गावातील महिला आणि ज्येष्ठ लोकांनी पालखीचे पूजन केले. पालखीमध्ये वृक्ष दिंडी पाहून सर्वांना या बाल वारकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हा वन अधिकारी भोसले , जाधव , तोंबरे , वन रक्षक, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.