विदेश

महिलेचा कॅब चालकांवर जडला जीव ; लंडन वरून आली पळून 

Spread the love

पणजी  / नवप्रहार डेस्क 

                प्रेमात जात – पात , गरीब * श्रीमंत असा भेदभाव नसतो. आणि प्रेम फक्त देशातील व्यक्ती सोबतच होते असे नाही. तर ते साता समुद्रापार राहणाऱ्या व्यक्ती सोबतही होऊ शकते. म्हणूनच तर म्हटल्या जाते की प्रेमाला सीमा आणि मर्यादा नसतात. अशीच घटना लंडन मध्ये राहणाऱ्या महिले सोबत घडली आहे. लंडन येथील  35 वर्षीय महिलेचा हैदराबाद येथील कॅब ड्रायव्हर वर जीव जडल्याने ती तेथून त्याला भेटायला हैदराबाद येथे आली. बरं  त्यासाठी तिने अपहार झाल्याचा बनाव रचला.

        उपलब्ध माहीती नुसार लंडन ला राहणारी महिला मुलांना घेऊन गार्डन मध्ये गेली. त्यांना तेथेच सोडून ती भारतात पळून आली. मुलांनी मोबाईल वर याची माहिती वडिलांना दिली. पतीने पोलिसांत धाव घेत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तर, महिलेने प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी अपहरणाचा बनाव केला.

कॅब ड्रायव्हर आणि कथित बेपत्ता झालेली महिला दोघेही गोव्यातून परत येताना सायबराबाद पोलिसांना आढळून आले.

झाले असे की बेपत्ता झालेली महिला काही दिवसांपूर्वी पती आणि मुलांसोबत भारतात होती. महिलेचा पती सॉफ्टवेअर अभियंता असून, लंडनमध्ये कार्यरत आहे. पती माघारी गेल्यानंतर देखील महिला हैद्राबादमध्येच होती या काळात, महिला एका कॅब ड्रायव्हरच्या संपर्कात आली. दोघांमध्ये जवळीकता वाढली, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

महिला माघारी लंडनला गेल्यानंतर देखील दोघांमधील संपर्क कायम होता. महिलेच्या सासूचे निधन झाल्याने तिचा पती हैद्राबादला आला होता. यावेळी महिला मुलांसह लंडनमध्येच होती.

पती हैद्राबादला असताना महिला मुलांसोबत लंडनमध्ये एका गार्डनमध्ये गेली होती. दरम्यान, दोन्ही मुलांना गार्डनमध्येच सोडून महिलेने तेथून पळ केला. मुलांनी आई बेपत्ता झाल्याची माहिती हैद्राबाद येथे असणाऱ्या वडिलांना दिली. महिलेच्या पतीने संबधित घटनेची तक्रार हैदराबाद येथील सायबराबाद पोलिस ठाणे आणि विमानतळ पोलिसांना दिली.

Subhash Velingkar: ते आले, पोलीस ठाण्यात गेले; 20 मिनिटात बाहेर पडले; सुभाष वेलिंगकरांच्या चौकशीच्या वेळी काय घडले?सायबराबाद पोलिसांनी तक्रारीनुसार घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना दोघेही गोव्यातून परत येताना आढळून आले. अपहरण झाले नाही तर मी मर्जीने त्याच्यासोबत गेल्याची कबुली महिलेने पोलिसांना दिली.

व्हिडिओ पाठवून पतीला दिली अपहरण झाल्याची माहिती

महिलेने एक व्हिडिओ पाठवून तिचे अपहरण झाल्याची माहिती दिली. कॅब ड्रायव्हरने अपहरण केले असून तिला अनोळखी ठिकाणी घेऊन गेल्याची माहिती महिलेने व्हिडिओतून दिली. व्हिडिओ पाहून पतीने ई-मेलद्वारे सायबराबाद पोलिसांत तक्रार दाखल केली.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close