सामाजिक

ऊर्जा प्रभाग संघाची प्राथनिधीक सभा तालुका व्यवस्थापन कक्ष चांदुर रेल्वे येथे घेण्यात आली

Spread the love

 

 सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रार्थना घेऊन सभेला सुरुवात.

चांदुर रेल्वे ( ता. प्र. ) प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे येथे आज दिनांक 30/6 /2024 रोजी तालुका व्यवस्थापन कक्ष चांदुर रेल्वे येथे ऊर्जा प्रभात संघाची प्राथनिधिक सभा घेण्यात आली. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर प्रार्थना घेण्यात आली व सर्वांचा परिचय घेण्यात आला. आजच्या सभेला ऊर्जा प्रभाग संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच पेठे सर व सविता थेटे मॅडमउपस्थित होत्या. प्रभाग समन्वयक मोनिका मुनघाटे मॅडम त्यांनी प्रभाग संघाच्या सक्षमीकरण व ग्राम संघाच्या बळकटी साठी तसेच प्रभाग संघाच्या व्यवहाराची माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्रभाग संघाच्या लिपिका प्राजक्ता काळे यांनी प्रभाग संघाचे लेखाजोखा वाचन केले. थेटे मॅडम यांनी ग्राम संघाच्या व्यवहाराविषयी रेकॉर्ड विषयी आणि प्रभाग सांगा विषयी मार्गदर्शन केले. तर पेटी सर यांनी प्रभाग संघाच्या ऑफिस विषयी PMFME च्या प्रस्तावा विषयी उद्योग आधार व लायसन्स विषयी मार्गदर्शन केले. सर्व कॅडरचा मासिक आढावा घेण्यात आला. ह्या सभेचे संचालन दीपिका मोहोळ यांनी केले.
तर आभार प्रदर्शन मनीषा बागडे यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close