क्राइम

हातावर संदेश लिहत तिने उचलले टोकाचे पाऊल 

Spread the love

इंदूर / नवप्रहार डेस्क 

                   नवऱ्याचे मैत्रिणीशी असणाऱ्या अफेअर मुळे नवरा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने  नवऱ्याच्या त्रासाला कंटाळलेल्या बायकोने हातावर सुसाईड न लिहत आपले जीवन संपवले आहे. मध्यप्रदेशातील इंदूर मध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे.  हातावर लिहलेल्या मजकुरात .

त्यामध्ये तिने पती आणि प्रियकरावर छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पती आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली आहे.

ही संपूर्ण घटना तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्व्हर स्प्रिंग परिसरात घडली. येथे राहणाऱ्या ४० वर्षीय कविता यांनी पती पंकज पाटील यांच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी पीडितेने तिच्या हातावर पंकज आणि त्याची मैत्रीण नम्रता यांची नावे लिहून त्यांना मृत्यूसाठी जबाबदार धरले. वास्तविक, नवरा पीडित पत्नीच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला होता. पत्नीला पतीच्या अफेअरची माहिती मिळताच त्यांच्यात वारंवार वाद होत होते.

दरम्यान पीडित महिलेला दोन मुली आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी पीडितेने दोन्ही हातांवर मराठीत नोट लिहून ठेवली होती. तिने तिच्या दोन्ही हातांवर तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांची नावे लिहिली आहेत.

पीडित महिलेलने हातांवरील नोटमध्ये लिहिले आहे की, नम्रतामुळे तिचा पती तिला बेदम मारहाण करायचा. तसेच लहानसहान गोष्टीवरून वाद घालायचाय

नम्रता आणि पंकजमध्ये 2 वर्षांपासून अफेअर सुरू होते. एवढेच नाही तर मृताच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोपही केले आहेत.0

आत्महत्या करण्यापूर्वी पीडित महिलेलने तिच्या हातावर मराठीत नोट लिहिली आहे. मी दोन वर्षांपासून त्रासात आहे. पंकज आणि नम्रता यांना जेव्हा फाशी होईल तेव्हाच मला न्याय मिळेल.

नोटच्या आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कविता यांना दोन मुली आहेत. एक मुलगी स्थानिक  तर एक मुलगी पुण्यात शिकते. या मुलींनींही सांगितले की, त्यांचे वडील त्यांच्या आईला त्रास देत असत.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला नम्रता आणि पती पंकजला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close