क्राइम

पोलिस अधिक्षकांना चौकशी अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

Spread the love

 

ललीत गजभिये विरुध्द पोलिस प्रकरण

प्रतिनिधी यवतमाळ

यवतमाळ येथील ललीत गजभिये विरुध्द सय्यद मन्सुर आणि पोलिस यांच्यातील न्यायालयीन प्रकरणात यवतमाळचे पोलिस अधिक्षक यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश केळापूर न्यायालयाने दिले आहे. आरोपी सोबत संगनमत करुन पोलिसांनी आपल्याविरुध्द खोटे गुन्हे दाखल केल्याचा ललीत गजभिये यांचा आरोप असून त्यांनी या प्रकरणी केळापूर न्यायालयात केस दाखल केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने सदर आदेश पारीत केले आहे.

ललीत गजभिये हे यवतमाळ येथील रहिवासी असून मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटावरील रेतीची तस्करी बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती. ही तक्रार देताच मारेगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी संतापले. त्यांनी रेती घाटावर तस्करी करणारे कादर, मनसूर, सय्यद दाऊद यांचेसोबत मिलीभगत करुन ललीत विरुध्द देशी कट्टा दाखवून खंडणी मागितल्याची तक्रार दाखल करुन घेतली असा आरोप ललीत यांचा आहे. विशेष म्हणजे दुसरेच दिवशी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी आपल्या पथकातील अधिकारी विवेक देशमुख, साजीद, अजय डोळे, तसेच इतर कर्मचा-यांना ललीत यांना पकडण्यासाठी रात्री 8.40 वाजता दर्डा नाका, यवतमाळ येथील ललीत यांच्या कार्यालयावर पाठविले होते. ललीत हे पोलिसांच्या सुचनेप्रमाणे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर रात्री 3 वाजता मारेगाव पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी झानेश्वर सावंत यांनी अटक करुन ललीतला मारेगावला नेले. कपडे उतरवून लॉकअप मध्ये ठेवण्यात आले. दुसरे दिवशी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांचा रिमांड घेतला. पोलिसांनी कट रचून ललीत यांच्या घरुन देशी कट्टा जप्त केल्याचा रिपोर्ट तयार केला असा ललीत यांचा आरोप आहे. या घटनेमुळे त्यांना दोन महिने यवतमाळच्या कारागृहात राहावे लागले. या संदर्भात यवतमाळचे पोलिस अधिक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती, गृहमंत्री, मुख्यमंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रारी करुनही न्याय न मिळाल्याने त्यांनी केळापूर न्यायालयात केस दाखल केली आहे. आता या प्रकरणात केळापूर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश एच.एस. सातभाई यांनी यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षकांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. ललीत गजभिये यांच्या वतीने पांढरकवडा येथील वकील सिध्दार्थ लोढा तसेच उच्च न्यायालयातील वकील श्री. भांडारकर हे त्यांचे बाजुने काम पाहत आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close