ईश्वरापेक्षा गुरुचे स्थान मोठे आहे- डाॅ.हितेन्द्र सोरटे
ज्योतिष विद्यालयात गुरु पोर्णिमा उत्साहात साजरा
भंडारा -/ प्रतिनिधी
बालपणासूनच मनुष्य आपले आई वडील, गुरूजन, वडिलधारी व्यक्ती तसेच समाजातून बरेच काही शिकत असतो. या सर्व क्षेत्रात त्यांना अनेक गुरू जनांचा अनुभव प्राप्त होत असतो. सर्व क्षेत्रात त्याला ज्ञान प्राप्त होत असल्याने ईश्वरापेक्षा गुरूंचे स्थान मोठे आहे असे, ज्योतिष विद्यालय भंडारा चे संस्थापक अध्यक्ष डॉ हितेंद्र सोरटे यांनी गुरुपोर्णिमा कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन यांनी केले.
ज्योतिष विश्व विद्यापीठ, ओंकारेश्वर द्वारा संचलित ज्योतिष विद्यालय भंडारा च्या वतीने गणेश हायस्कूल येथे गुरू पोर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात प्राजक्ता संगीतराव यांनी सरस्वती स्तवन, गुरू समर्पन स्तुती, सामुदायिक प्रार्थना व नवग्रह स्तोत्र च्या पठणाने केली . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्योतिष विद्यालय चे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ हितेंद्र सोरटे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपुर चे आचार्य मंजूषा सोरटे से होते. पुढे म्हणाले की,गुरू, सद्गुरु व गुरुपोर्णिमा चे मानवी जिवनात अतिशय महत्त्व आहे.तसेच ज्योतिष विश्व विद्यापीठ ओंकारेश्वर चे संस्थापक गुरुवर्य डॉ भुपेश गाडगे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनात मागील पांच वर्षा पासून अविरत महाविद्यालय चे कार्य सुरु असल्याचे सांगितले.
याप्रसंगी डॉ हितेंद्र सोरटे, मंजुषा सोरटे व आदित्य सोरटे यांचा ज्योतिष विद्यालयातील सदस्यांच्या वतीने अजय संगीतराव व प्राजक्ता संगीतराव यांनी शाॅल,श्रीफळ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.
विद्यालयाच्या के व जे बॅच च्या ज्योतिष विशारद परिक्षेत प्रथम छाया नारनवरे,द्वितीय शिंवागी किन्हिकर,व तृतीय डॉ विजया चंदनबटवे यांनी गुणवत्ता प्राप्त केले.त्याबद्दल मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.तसेच परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व सदस्यांना प्रमाणपत्र देवुन डॉ सोरटे यांनी गौरव केला. यावेळी गुरु पोर्णिमेनिमीत्त उपस्थितांना भेट वस्तू देण्यात आली.
त्यानंतर मार्गदर्शन करतांना सौ मंजुषा सोरटे यांनी गुरुतत्व व गुरुग्रह यावर विविध उदाहरणे देवून माहिती दिली.
गुरुपोर्णीमाचे औचित्य साधून गणेश हायस्कुल च्या परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यालयाचे सदस्य डॉ बबन मेश्राम यांनी तर प्रास्ताविक प्रशांत खंडाळे यानी,गुरुसर्मपित पत्रवाचन अजय संगितराव यांनी तर आभार प्रदर्शन नेहा कारेमोरे यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे सदस्य
राजेश करंडे, अंकुश चुटे, अजय संगीतराव ,प्रशांत खंडाळे,शैलेश साऊसाखरे, पवन हेडाऊ, नेहा कारेमोरे, छाया नारनवरे, शिवांगी किन्हीकर भारती जांबुळकर, मिनाक्षी ठवकर, प्राजक्ता संगीतराव, स्नेहलता बांगरे ,विनोद उके, प्रफुल्ल नागापुरे, राहुल भानारकर, चित्रा झुरमुरे, राखी सुर, अतुल खोब्रागडे, गौरी कोतवाल डॉ देविदास बोधनकर, प्रमोद कारेमोरे , डॉ.सुलभा मेश्राम, प्रसाद चिखलीकर सह सर्व सदस्यांनी अथक परीश्रम घेतले.