हटके

७४ वर्षाच्या म्हाताऱ्याला कॉलंगर्ल ची भेट पडली 30 लाखात

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया 

            पुमे तिथे काय उणे असे गंमतीने म्हटल्या जाते. पण या म्हणीला सार्थ ठरवणारा प्रकार शहरात घडला आहे. येथे एका ७४ वर्षाच्या म्हाताऱ्याला एका महिलेच्या माश्यामातून कॉलगर्ल ला भेटणे 30 लाख 30 हजारात पडले आहे.

                 या काहीश्या रंजक आणि लाजिरवण्या प्रकाराबद्दल अधिक माहिती अशी की , गोखले नगर येथे राहणाऱ्या फिर्यादीने जुलै महिन्यात आरोपी ज्योती बनवडे हिच्या माध्यमातून कॉलगर्ल। ची भेट घेतली होती.  त्यानंतर ज्योतीने फिर्यादीला कॉल करून त्या कॉलगर्ल ला पोलिसांनी मोबाईल चोरीच्या आरोपात पकडले असून तिच्या कॉल रेकॉर्ड मध्ये तुमचेही नाव आहे. त्या आधारे पोलीस तुमच्या पर्यंत पोहोंचू शकतात. तुमचे नाव बाजूला ठेवायचे असल्यास तुम्हाला पैशे द्यावे लागतील अशी भीती दाखवत ज्योती आणि तिचा सहकारी रामचंद्र बापू यांनी त्यांच्या जवळून पैशे उकळले.

             हा प्रकार वारंवार करुन त्यांच्या जवळून30 लाख 30 हजार रुपये उकळले. हा प्रकार पाच जुलै ते १७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मार्केट यार्ड परिसरात घडला. हा प्रकार असह्य झाल्याने म्हाताऱ्याने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांनी मार्केट यार्ड पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखप करत त्यांना अटक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close