क्राइम

प्रसिद्ध खेळाडू ची गोळ्या झाडून हत्या

Spread the love

दक्षिण आफ्रिका / नवप्रहार मीडिया 

                   दक्षिण आफ्रिकेतून क्रीडा विश्वाला हादरवणारी बातमी समोर येत आहे. दरोडखोरांनी केलेल्या गोळीबारात प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि ओलम्पिकविर ल्युक फ्ल्यूर्स असे त्याचे नाव आहे.दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत  गोळी लागून त्याचा मृत्यू झाला आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू आणि ऑलिम्पियन ल्यूक फ्लूर्स याची दरोड्याच्या घटनेत हत्या करण्यात आली. ल्यूकचा क्लब काइजेर चीफ्स यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. 24 वर्षीय बचावपटू ल्यू हा हनीड्यू परिसरात पेट्रोल पंपावर रांगेत उभा असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. फ्लूर्स टोकयो ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा सदस्य होता.

‘ल्यूक फ्लूर्सची जोहान्सबर्गमध्ये दरोड्याच्या घटनेत बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसाठी सहवेदना व्यक्त करतो.’ असे क्लबकडून सांगण्यात आले.

‘हल्लेखोर ल्यूकची कार घेऊन फरार झाले आहेत. पोलिस कारची लूट आणि हत्याप्रकरणी तपास करत आहेत’ असे पोलिसांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close