भंन्ते नागसेन बौध्दभिक्षू निवास येथे डा.आंबेडकर जयंती
वरठी (भंडारा)/ नवप्रहार मीडिया
हनुमान वार्ड येथील भंन्ते नागसेन बौध्दभिक्षू निवास येथे विविध कार्यक्रमाने भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौध्द विहार समितीचे सचिव प्रा. डा. बबन मैश्राम होते तर प्रमुख उपस्थित मोहाळी प. स चे सभापती रितेश वासनिक,पवन रामटेके, मुख्याध्यापक लिगांईत, मोहन चव्हाण, मोतिलाल वासनिक, संघदिप मेश्राम, अतुल डोंगरे, माधूरी मेश्राम, लोणारेजी,पार्थ दुपारे,ममता लाडे, छाया मेश्राम,कमला वाहणे, पंचशिला देशभ्रतार,अंनत मेश्राम, शारदा चव्हाण,शंकुतला वाहणे, वर्षा मेश्राम,विद्या खांडेकर,अन्वी मेश्राम, सत्यभामा मेश्राम, बेबीताई मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महिलानी भिम गिते सादर केली तसेच प्रमुख अतिथी यांनी डा. आंबेडकर यांच्या जिवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.
संचलन समितीचे कोषाध्यक्ष धनलाल मेश्राम यांनी केलै तर आभार आंनद वाहणे यांनी मानले.