महिलेच्या नाकात सापडली अशी गोष्ट की डॉक्टर ही झाले हैराण

अर्जेंटिना / नवप्रहार डेस्क
गेली ३५ वर्षे नाकाने श्वास घेणाऱ्या तरुणीच्या नाकात सापडली अशी वस्तू की डॉक्टरही झाले हैराण. मुख्य म्हणजे या महिलेला नाकाने श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे ती तोंडाने श्वास घेत होती.कँडेला रेबॉड असे त्या महिलेचे नाव आहे.
आयुष्याची ३५ वर्षं एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला नीट धावता किंवा खेळता येत नव्हतं. साधं १०० मीटर चाललं तरी धाप लागायची. तिला वाटत होतं की फुफ्फुसांमध्ये काहीतरी गडबड आहे. अखेर कुटुंबाच्या आग्रहाखातर ती डॉक्टरांकडे गेली. आणि डॉक्टरांनी तिच्या नाकातून अशी गोष्ट बाहेर काढली की पाहून तुमच्याही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तब्बल ३५ वर्षं ती वस्तू तिच्या नाकामध्ये अडकलेली होती, त्यामुळे बिचाऱ्याला तोंडानेच श्वास घ्यावा लागत होता.
ही घटना अर्जेंटिनामध्ये घडली आहे. कँडेला रेबॉड नावाची महिला श्वसनाच्या त्रासामुळे अगदी वैतागली होती. तिला वाटलं काहीतरी वैद्यकीय समस्या आहे, कारण लहानपणापासूनच तिला श्वास घेण्यास अडचण होती. पण डॉक्टरांनी नाकाची नीट तपासणी केली तेव्हा तिच्या श्वसनमार्गात चक्क चिकटपट्टीचा तुकडा सापडला. हा तुकडा चक्क ३५ वर्षं नाकात अडकलेला होता, ज्यामुळे तिची एक नाकपुडी अर्धी बंद झाली आणि श्वसनात समस्या निर्माण झाली. डॉक्टरांनी काही मिनिटांत तो चिकटपट्टीचा तुकडा बाहेर काढला. त्यामुळे ती आता कित्येक वर्षांनंतर मोकळा श्वास घेत आहे. तिला विश्वास बसत नाहीये की एका पट्टीमुळे इतकी वर्षे श्वास कोंडलेला होता.
हा तुकडा तिच्या नाकात गेला कसा?कँडेलाला या पट्टीबाबत काहीच कल्पना नव्हती. पण तिने पालकांकडे चौकशी केली तेव्हा समजलं की जन्माच्या वेळी तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या एका नाकपुडीत नळी घातली होती. त्या नळीला लावलेली चिकटपट्टी कदाचित आत राहिली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जाते. हा प्रकार पाहून डॉक्टरही चक्रावले आहेत. पण दुसरीकडे, पट्टी निघाल्यामुळे कँडेला मात्र अत्यंत आनंदी आहे.




