हटके

सावधान …  महामार्गावर लिफ्ट देत असाल तर जरा सांभाळून !

Spread the love

शिरूर / नवप्रहार डेस्क

                   तुम्ही रस्त्याने जात असाल आणि एखादी महिला  किंवा तरुणी तुम्हाला लिफ्ट मागत असेल तर माणुसकी या नात्याने कोणीही थांबुन  त्यांना लिफ्ट देईल. पण तुम्ही दाखवलेली ही सहानुभूती किंवा दया तुमच्या अंगलट येऊ शकते. पुणे- नगर महामार्गावर हात दाखवून चारचाकी वाहनात लिफ्ट मागायची. नंतर त्या वाहन धारकाला ब्लॅकमेल करून त्याच्या कडून पैसे उकळायचे हा  प्रकार याठिकाणी सर्रास सुरू आहे.

शिरुर तालुक्यात लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. पण ‘उगाच नको इज्जतीचा पंचनामा’ या भावनेने अनेकजण पोलिस स्टेशनला जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे अनेक युवती आणि महिला या गोष्टीचा फायदा घेत ‘आर्थिक’ फसवणुक करत आहेत.

शिरुर तालुक्यातील एका गावातील राजकीय व्यक्तीला हा अनुभव आला आहे. आज रविवार (दि २४) रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथुन कारेगावकडे जात असताना न्हावरे फाटा येथे एका महिलेने ‘या’ राजकीय व्यक्तीकडे लिफ्ट मागितली. त्यावेळी ‘त्या’ महिलेने विचारले तुम्हाला कुठे जायचं आहे. त्यावेळी ‘या’ राजकीय व्यक्तीने कारेगावला जायचे असल्याचे सांगितले.

त्यानंतर ‘ती’ महिला गाडीत बसली आणि कारेगाव येथे आल्यानंतर महिलेने मला उशीर झालाय, प्लिज मला रांजणगावला सोडा अशी विनंती केली. त्यानंतर ‘या’ राजकीय व्यक्तीने तिला रांजणगाव येथील ‘महागणपती’ च्या पार्किंग येथे सोडले. गाडीतुन उतरल्यानंतर ‘त्या’ महिलेने राजकीय व्यक्तीला तुमच्याकडे २०० रुपये सुट्टे पैसे आहेत का…? अशी विचारणा केली. तेव्हा ‘ त्या’ व्यक्तीने पैसे नाहीत असे सांगितले दिला. पण नंतर महिलेने जास्त गयावया केल्यानंतर त्याने पाकिट उघडून ‘त्या’ महिलेला २०० रुपये सुट्टे दिले.

पण ‘या’ राजकीय व्यक्तीच्या पाकिटात ‘चिक्कार’ पैसे असल्याचे पाहताच ‘त्या’ महिलेने मला ते पैसे दे असे म्हणत, तु माझी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने छेडछाड केल्याचा ‘कांगावा’ करत मोठयामोठयाने ओरडायला सुरवात केली. अन फोन कानाला लावत ‘साहेब लवकर या’ एकाने माझी छेड काढली आहे अस सांगत कोणाला तरी बोलावलं. त्यानंतर ‘या’ राजकीय व्यक्तीने समयसुचकता दाखवत गाडीतुन खाली उतरत त्याच्या मित्रांना फोन करुन ‘एक अनोळखी बाई मला ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचे सांगितले.

त्यानंतर ‘ती’ बाई घाबरली आणि आपण केलेला हा खोटा प्रकार आपल्याच अंगलट आल्याचे लक्षात आल्यानंतर तिने रांजणगाव गणपती मंदिराच्या परिसरात धुम ठोकली. आज रविवार असल्यामुळे अनेक भाविक ‘महागणपती’ च्या दर्शनाला आले असल्याने मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत ‘ती’ बाई पसार झाली. ती राजकीय व्यक्ती आणि त्याच्या मित्रांनी सुमारे एक तास आजूबाजूच्या परिसरात ‘त्या’ बाईचा शोध घेतला पण तोपर्यंत ती पसार झाली होती. त्यामुळे भविष्यात पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देणे एखाद्या व्यक्तीला महागात पडू शकते हे आजच्या घटनेतुन सिद्ध झाले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close