Uncategorized

कट्टरपंथी तरुणाला साधूंच्या शिबिरा बाहेरून अटक 

Spread the love

प्रयागराज  / नवप्रहार डेस्क .

                       उत्तरप्रदेश येथील प्रयगराज येथे महाकुंभ सुरू आहे. देशभरातून साधू संत येथे शाही स्नान करण्यासाठी आले आहेत. पण येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वतःला आयुष असल्याचे सांगत आयुब हा गाझियाबादमधील दासना मंदिराचे पुजारी आणि जुना आखाड्यातील नरसिंहानंद यांच्या छावणी बाहेर फिरताना साधूंनी पकडले आहे.

अयुबला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून घडलेल्या प्रकरणाची चौकशी केली. , याबाबत पोलीस माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आयुब हा मंगळवारी १४ जानेवारी २०२५ रोजी यती नससिंहनंद यांच्या तंबूभोवती फिरत होता. त्याच्या हातामध्ये वस्तू होती. ती वस्तू संशायस्पद असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणात काही संतांनी त्याला पकडले. दरम्यान, संबंधित युवकाची चौकशी करत असताना त्याने आपल्या नावाचा खुलासा केला. माझे नाव आयुष नसून आयुब आहे असे त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने आपली वैयक्तिक माहिती सांगितली. तो उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. वडीलांचे नाव शाकीर अली आहे. त्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. कुंभदर्शनासाठी तो एकटा आला होता. कोणीही मला पाठवले नसल्याचे चौकशमीदरम्यान म्हणाला. पुढे तो म्हणाला की, मला माहिती नव्हतं की महाकुंभात येण्याची परवानगी नाही. मात्र मी कानपूरहून गोरखपूरला जाण्यासाठी रेल्वेमार्गे प्रवास करत असताना मी प्रयागराजला पोहोचलो.

या घटनेमध्ये नरसिंहानंद यांनी सांगितले की, “महाकुंभमध्ये त्याची हत्या होईल. यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे, ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी गाझियाबादमध्ये दासना मंदिराबाहेर १० हजार मुस्लिमांच्या जमावाने हल्ला केला होता. त्यामुळे मी सतत रेकी करत असतो. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या जुबेरनेही धमकी दिली. त्यानंतर त्यानेच मंदिरावर हल्ला केला होता,” अशी माहिती नरसिंहानंद यांनी दिली.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close