आईला अन्य पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहून बनवला व्हिडीओ अन ….

प्रतिनिधी /मुरैना
प्रेमात व्यक्ती वेडा होतो असे म्हणतात. पण हे खरं आहे ! कारण प्रेमात पडेलल्या व्यक्तीला त्या दोघांशिवाय काहीच दिसत नाही. एकमेकांतच त्यांचे जग असते. ते एकमेकांत इतके गुंतून जातात की त्यांना त्या दोघांशिवाय इतर दूरचे वाटतात. पतीला सोडून अन्य पुरुषा सोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेला जेव्हा कळले की तिच्या 14 वर्षीय मुलाने त्यांना नको त्या अवस्थेत पाहिले आणि त्याचा व्हिडीओ बनवला तेव्हा तिने तिच्या प्रियकरा करवी स्वतःच्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेश राज्यातील मुरैना येथे घडली आहे. अत्यंत शिताफीनं गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करूनही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील मुरैना इथं एका 14 वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू होता. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली होती. तपासात पोलिसांना मुलाच्या आईवरच संशय आल्यानं पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला. चौकशीत आईनं गुन्हा कबूल केला.
आरोपी रफिक खान याचं पंक्चर काढायचं दुकान आहे. त्याच दुकानात महिलेचा मुलगा काम करत होता. आरोपीनं पोलीस चौकशीत कबूल केलं की महिलेचे आणि त्याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळेच त्यानं महिलेच्या मुलाला त्याच्या दुकानात कामावर ठेवून घेतलं होतं. त्या मुलानं आरोपी रफिक आणि त्याच्या आईला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. त्यानं त्यांचा एक व्हिडिओही रेकॉर्ड केला होता.
त्याबाबत आरोपी आणि महिलेला समजल्यामुळे ते दोघंही घाबरले होते. तो व्हिडिओ मुलगा वडिलांना दाखवेल, याची भीती महिलेला होती. त्यामुळे तिनं रफिकवर दबाव टाकून त्याला मुलाची हत्या करण्यास भाग पाडलं. रफिकनं क्षमा मागण्याकरता मुलाला बोलावून घेतलं, मग बाईकवर मागे बसवून तो त्याला बीहड इथं घेऊन गेला. तिथे त्याला गळा दाबून मारलं. रात्रीपर्यंत मुलगा घरी न आल्यामुळे वडील लोकेन्द्र यांनी पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनीही मुलाचा शोध सुरू केला. दरम्यान, दोन डिसेंबरला मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट तपासलं. त्यावर दिसलेल्या एका व्हिडिओत तो मुलगा रफिक खान याच्यासोबत दुकानात जाताना दिसला. त्यावरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी रफिकची कसून चौकशी केली. तेव्हा त्यानं गुन्हा कबूल केला. महिलेचीही चौकशी केली असता तिनंही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. रफिकला मुलगा नसल्यामुळे त्यानं तंत्र-मंत्राचा वापर करून मुलाची हत्या केल्याचा आरोप लोकेन्द्र यांनी केलाय, तर पत्नीलाही जाणूनबुजून फसवल्याचं त्यांनी म्हटलंय. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.