तिवसा पत्रकारांना धमकी देणाऱ्या रेती माफिया वर गुन्हा दाखल करावा या मागणीकरिता; मुख्यमंत्र्यांना निवेदन
तहसीलदार ह्यांचे मार्फत मुख्यमंत्री ह्यांना निवेदन सादर

अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी /
पत्रकार हा लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ असून समाजातील वाईट प्रवृत्ती विरोधात निर्भीड पत्रकारिता करीत असताना त्याला वारंवार गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सामना करावा लागतो. अशातच ता.४ मार्च ला तिवसा येथील पत्रकार हेमंत निखाडे व प्रशिक मकेश्वर या पत्रकारांना स्थानिक रेती माफी यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्या रेतीमाफीयांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी असे निवेदन अंजनगाव सुर्जी येथील तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद व पावर ऑफ मीडिया या संघटनेतर्फे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून अमरावती जिल्ह्यात पत्रकारवांवर वारंवार गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हमले व धमकी जिवे मारण्याच्या धमक्या येत असून पोलीस प्रशासन अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात थातूरमातूर कारवाई करून एक प्रकारे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देत असल्याचे दिसून येते ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असताना कोणतेही साधन उपलब्ध नसताना आपल्या जीवावर उदार होऊन ग्रामीण पत्रकार पत्रकारिता करीत असतो अमरावती जिल्ह्यात रेतीमाफी यांचा सुळसुळाट झाला असताना काल-परवा तिवसा येथील पत्रकारांना दिलेले धमकी, पर्थोट येथील नितीन दुर्गुडे ह्या पत्रकारांवर झालेला हमला व अंजनगाव सुर्जी येथील महेंद्र भगत या पत्रकारास झालेली मारहाण यावरून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही हे दिसून येते त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायदा खाली आणून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद व पावर ऑफ मीडिया तर्फे करण्यात आली आहे .यावेळी अंजनगाव सुर्जी येथील ज्येष्ठ पत्रकार व संपादक शिवदासजी मते ,पावर ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्ष मनोहर मुरकुटे ,तनुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोके, तालुका अध्यक्ष रवींद्र वानखेडे, अशोक पिंजरकर, संपादक नागेश गोळे, उमेश काकड, जयेद्र गाडगे , सचिन अब्रूक, सागर साबळे ,अनंत मोहोड, सुजित काठोळे, सुनील माकोडे, महेंद्र भगत व इतरही पत्रकार ह्याप्रसंगी उपस्थित होते.