मतदारसंघातील वृद्ध आणि अंध व्यक्तींना दृष्टी मिळावी यासाठी सदैव तत्पर – आमदार बळवंत वानखडे

अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी /
बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई दमानी आय हॉस्पिटल अकोला ,श्री दे झा वाकपंजर चॅरिटेबल ट्रस्ट अकोला आणि आमदार बळवंत वानखेडे त्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ मार्च 2023 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येवदा येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला दर्यापूर अंजनगाव सर्जी अचलपूर शहरी तसेच ग्रामीण परिसरातील शेकडो वृद्ध आणि अंध नेत्र रुग्णांनी सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये तपासणी झालेल्या 510 वृध्द व्यक्तींचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया फेरीनुसार दंमाणी नेत्र रुग्णालय अकोला येथे होणार आहे.
त्याअनुषंाने आज दिनांक 10 मार्च 2023 अंजनगाव सर्जी तालुक्यातील दहिगाव येथील कमल श्रीराम बुडकर,नम्रदा इंगळे, विमल शामराव तायडे,सविता पारखडे, नागोषे,सुशीला गावंडे साहेबराव इंगळे ,सुरेश इंगळे ,भीमराव चांडोने,प्रभा बाई सावळे, या रुग्णाची पहिली फेरी शस्त्रक्रिया साठी दमानी नेत्र रुग्णालय अकोला येथे आमदार बळवंत भाऊ वानखेडे मित्र परिवारातर्फे पाठवण्यात आली . या वेळेस ,दे झा वाकपंजार चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव इंजी नितेश वानखडे ,डॉ नालट,श्री पुरुषोत्तम घोगरे ,श्री कैलाश इंगळे ,बुधभूषण गवई ,यश अहेर यांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णाची सोय केली.