हटके

अन …. त्याने मृत्यूला हुलकावणी दिली

Spread the love

                     मृत्यू कुणाला कुठे गाठेल याचा काही नेम नसतो. पण काही लोकांचे नशीब इतके बलवोत्तर असते की ते मृत्यूलाही हुलकावणी देतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाऊस सुरू असल्याने एक तरुण छत्री घेऊन उभा असतो. इतक्यात त्याला काही तरी आवाज येतो. तो आवाजाच्या दिशेने बघतो तर तो ज्या झाडाखाली उभा असतो त्या झाडाची फांदी तुटणार असते.

        तो क्षणात जे काही समजायचे ते समजतो आणि स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण तो तोल जाऊन खाली पडतो. इतक्यात झाडाची फांदी तुटून वेगाने जमिनीच्या दिशेने येते. आणि नेमकी त्याच्या बाजूला पडते. जर ती फांदी त्याच्या शरीरावर पडली असती तर नक्कीच त्याचा जीव गेला असता किंवा तो गंभीर जखमी झाला असता.पण तो यावेळी मृत्यूला हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला.

                      हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लाखो युजर्स नी बघितला आहे. काहींनी त्याला लाईक केले आहे तर काहींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close