क्राइम

धर्मांध युवकाने लॉजवर नेत केला बलात्कार, जबरदस्तीने केले लग्न 

Spread the love

इंदापूर / नवप्रहार डेस्क

               एकाच वर्गात शिकत असल्याने त्याने तिच्याशी ओळख वाढवली. तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. तेथे त्याने तिला किस केले. तदनंतर त्याला एडिट करून तिला ब्लॅकमेल केले. मित्राच्या मदतीने तिला लॉजवर नेऊन बलात्कार केला. आणि लग्नसाठी जबरदस्ती केली. घटना इंदापूर तालुक्यातील भिगवण गावा नजिकची आहे. नासिर सिकंदर असे त्या धर्मांध तरुणाचे नाव आहे.

                     नासिर ने पीडितेशी जबरदस्तीने अकलूज येथे लग्न केले. बारामतीत काही महिने अत्याचार केला. मुस्लिम विधी करून आई-वडिलांच्या विरोधात तक्रार द्यायला भाग पाडले ही संतापजनक घटना इंदापूर तालुक्यातील भिगवन नजीकच्या गावात घडली असून, पिडीतेच्या नातेवाईकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत पोलिसांनी नासिर सिकंदर मुलाणी व परविन मुलाणी या दोघांसह पीडित मुलीच्या जवळच्या नातेवाईकांवर (पीडितेची ओळख स्पष्ट होऊ नये म्हणून नावे नमूद करण्यात आली नाहीत) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यासह बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 च्या आठ नियमानुसार, बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 12 नुसार, तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या 64, 64 (दोन)(म), 49, 74, 78, 3(5), 351(2) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

त्याची थोडक्यात हकीकत अशी, पीडित मुलगी भिगवण नजीकच्या एका शाळेत शिकत असताना त्याच शाळेत असलेल्या नासिर सिकंदर मुलानी याने तिच्याशी ओळख वाढवली व फिरायला घेऊन जाऊन तिचे किस घेतले. त्यावेळी त्याने फोटो काढून एडिट करून व्हिडिओ केले. घरच्यांना समजल्यानंतर घरच्यांनी विरोध केला, तेव्हा पीडित मुलीने त्याच्याशी ओळख थांबवली. मात्र जेव्हा पीडित मुलीने व्यवसाय सुरू केला, तेव्हा हा पुन्हा तेथे दिसू लागला.

अशा वेळी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील नासिरच्या मेहुणीने पुन्हा पीडित मुलीची भेट घेत त्याच्याशी ओळख करून दिली. तिने त्याच्यासाठी फोर्स केला आणि त्यानंतर मध्यस्थी करून भेट घडवून आणत नोव्हेंबर 2023 मध्ये भिगवण येथील आनंद लॉज मध्ये तिला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये ही याच लॉजवर या पीडित मुलीशी नासिरने शारीरिक संबंध केले, मात्र तो मित्राचा लॉज असल्याने तिथे नोंद घेतली गेली नव्हती.

20 मार्च 2024 रोजी नासिर हा या पीडित मुलीला इंदापूर येथे रजिस्टर लग्न करण्यासाठी म्हणून घेऊन गेला. मात्र केलेले कागद न वाचता जबरदस्तीने संमती घेऊन भिगवण मधील दोन मित्रांची मदत घेत या पीडित मुलीला अकलूज मध्ये नेले. तेथे मुस्लिम विधी करून नासिरची आई परविन मुलाणी व त्याच्या नातेवाईकांनी राजेगाव या परिसरात आणले व तेथे आई- वडिलांविरोधात तक्रार देण्यासाठी पीडित मुलीला धमकावले. त्यानंतर पीडित मुलीने आई-वडिलांविरूध्द जबाब दिला, मात्र या घटनेनंतर आई-वडिलांनी या मुलीला परत घरी नेले. तेव्हा नासिर याने तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले.

मात्र पुन्हा ही पीडित मुलगी जेव्हा स्वतःच्या घरी गेली, तेव्हा नासिर याने तिच्या चुलत भावाला व चुलतीला अमिष दाखवून या मुलीला बारामतीत जळोची येथे आणले व दोन महिन्याच्या काळात चुलतीने नासिर याच्याशी संबंध ठेवण्यासाठी भाग पाडून नासीरला मदत केली. चुलती त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या मुलीला दारू पाजायची, तसेच इतर पुरुषांशी संबंध ठेवणार का? अशी विचारणा करायची अशी तक्रार या मुलीने केली आहे.

दरम्यान 15 ऑगस्ट 2024 रोजी बारामतीतील तांबे नगर सिटी इन चौकाजवळ हे दोघेजण एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेले त्यावेळी नासीरने अत्याचार करून जबरदस्तीने बऱ्याच वेळा शारीरिक संबंध ठेवले व जबरदस्तीने मांस खायला घातले अशी तक्रार या मुलीने केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close