क्राइम

वैष्णवी ची हत्या करून तिच्या नवऱ्याला विचारले तुला यायला किती वेळ लागेल ?

Spread the love
नाशिक / विशेष प्रतिनिधी
          वर्तमान काळात लिव्ह इन मध्ये राहण्याची फॅशन समाजात रूढ होत आहे. एका विशिष्ट वयात विरुद्ध लिंगा प्रति नैसर्गिक रित्या असणाऱ्या आकर्षणा मुळे हा प्रकार घडत असला तरी समाज मनावर.मात्र याचे वाईट परिणाम पाहायला मिळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या साहिल आणि वैष्णवी मध्ये वाद झाल्याने ती नाशिक निघून गेली होती. तेथील एका पीजी मध्ये ती राहत होती. नातेवाईकांनी तिचे लग्न जुळवले होते. ती आपल्या मैत्रिणीसोबत बागेत बसून नवऱ्यासोबत मोबाईल वर बोलत असताना साहिल तेथे आला.आणि वैष्णवी सोबत बोलू लागला. बोलताना त्यांच्यात वाद झाला आणि त्याने सोबत असलेल्या चाकूने तिच्यावर वार करून तिचा खून केला. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने वैष्णवी च्या सुरू असलेल्या मोबाईल वरून तिच्या भावी नवऱ्याला फोन लावुन तुला इथे यायला किती वेळ लागेल ? असे विचारले.
 नाशिकमधील इंदिरानगर परिसरामध्ये एका २० वर्षीय वैष्णवी अनिल आवारे या तरूणीची निघृणपणे हत्या करण्यात आली. हत्या करणारा हा तिचाच एक्स बॉयफ्रेंड होता. साहिल अशोक लाव्हारे असं हत्या करणाऱ्या मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनमध्ये तरुणीच्या हत्येची घटना घडली आहे. रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असल्याचं समोर आलं आहे. ही तरूणी वनसंपदा सोसायटीमध्ये पीजीमध्ये राहत होती. एका सपासप वार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर फरार झाला.
उमरखेडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशी माहिती समोर आली. मात्र मागच्या काही काळापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे, अलीकडेच वैष्णवी ही नाशिकमध्ये शिफ्ट झाली. ती एका पीजीमध्ये राहत होती. तिच्या नातेवाईकांनी नाशिकमध्ये एका तरुणासोबत आठवड्याभरापूर्वीच लग्न ठरवलं होतं.
याची कुणकुण साहिलाला लागली. साहिल हा नाशिकमध्ये पोहोचला. वनसंपदा सोसायटीजवळ शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास वैष्णवी ही आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. साहिल तिथे आला आणि वैष्णवीला जाब विचारला. दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. आधीच साहिलने सोबत चाकू आणला होता. त्याने चाकू काढला आणि वैष्णवीवर हल्ला चढवला. त्यावेळी वैष्णवी ही होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत होती.
त्याचवेळी साहिलने तिच्यावर चाकूने वार केला. वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. वैशूला आज संपवलं, असं तो ओरडून सांगत होते, हे सगळं बोलणं वैष्णवीच्या होणाऱ्या नवऱ्याने ऐकलं. एवढंच नाहीतर वैष्णवीचा फोन हातात घेऊन त्याने “आता तू कुठे आहेस, तुला इथं यायला किती वेळ लागेल?’ अशी विचारणाच साहिलने केली होती.
साहिलने घेतला गळफास
वैष्णवीच्या मानेवर चाकूने वार झाले होते, अतिप्रमाणात रक्त स्त्राव झाल्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी तिच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केला, घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत साहिल तिथून फरार झाला. इंदिरानगर पोलिसांची पथके त्याचा कसून शोध घेत असतानाच, मध्यरात्री सुमारे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. एका झाडाला साहिलने
मिळाली. एका झाडाला साहिलने गळफास घेऊन आपला जीव दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close