क्राइम

आरोपी पैकी एक स्वतःच्या वडिलांचा खुनी 

Spread the love
कोल्हापूर  / विशेष प्रतिनिधी
         शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात झालेल्या गोळीबारातील आरोपींपैकी एक आरोपी स्वतःच्या वडिलांचा खुनी असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
सराईत गुंड सूरज हणमंत साखरे
याच्यावर भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमागे अनैतिक संबंधाची झालर असून त्याचा काढण्यासाठी  सुपारी देण्यात आली असल्याची बाब उघड झाली आहे.
 या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 12 तासांत कुख्यात टोळीशी संबंधित दोघांना म्हणजे यातील एकावर स्वतःच्या वडिलांच्याच खुनाचा गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर होता.
रफिक ऊर्फ देवा पीरसाहेब मुल्ला (वय 39, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) आणि शहबाज राजू मुल्ला (वय 23, रा. मणेर मळा) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी कर्नाटकात पलायनाच्या तयारीत असताना जयसिंगपूर येथील अंकली पुलाजवळून त्यांना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून पि शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘मोका’अंतर्गत कारवाईतून बाहेर आलेला सराईत गुंड सूरज साखरेवर गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरात गोळीबार झाला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या दोघा आरोपींना अवघ्या 12 तासांत पकडण्यात आले. रफिक मुल्ला ऊर्फ देवा आणि शाहबाज गँगसोबत उठबस होती. त्यामुळे या सुपारीमध्ये या दोन्ही टोळ्यांचा सहभाग तपासला जात आहे.
देवाने केली फायरिंग
देवा आणि शाहबाज यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा दोघांनी गोळीबाराची कबुली दिली. शाहबाज दुचाकी चालवत होता तर देवा उर्फ रफिक याने पिस्तुलातून फायरिंग केल्याचा खुलासा झाला आहे.
आधी वडिलांचा खून केला आता…
धक्कादायक बाब म्हणजे याच रफिकने यापूर्वी कौटुंबिक स्वतःच्या वडिलांचाच खून केला होता. 2017 मध्ये वडिलांचा खून केल्याचा गुन्हा रफिकवर दाखल स्वतःच्या वडिलांचाच खून केला होता. 2017 मध्ये वडिलांचा खून केल्याचा गुन्हा रफिकवर दाखल असून तो सध्या जामिनावर सुटला आहे. त्याच्यावर मारामारीसारखे इतर गुन्हे देखील असून शाहबाज याच्यावर 2024 मध्ये मणेर मळ्यात जाळपोळीचा गुन्हा आहे. सध्या देवा बांधकाम व्यवसायत असून शाहबाज रिक्षाचालक म्हणून वावरतो.
अनैतिक संबंधातूनच सुपारी, पण दिली कुणी?
सूरज साखरेचा काटा काढण्यासाठी अनैतिक संबंधातूनच सुपारी दिल्याची माहिती आहे. पण सुपारी देणारा कोण होता? याचा उलगडा अ अद्याप झालेला नाही. पोलीस कसून तपास करीत असून लवकरच यातील सूत्रधार पुढे येणार असल्याचं सांगितलं जातंय. तसेच घटनेमध्ये वापरण्यात आलेले पिस्तूल कोल्हापुरातील एका आरोपीकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. याची देखील पडताळणी सुरू केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close