शैक्षणिक

एस ओ एस कब्स येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

Spread the love

सेल्फी पॉईंट ठरले मुख्य आकर्षण

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात कुमकूम तिलक व भेटवस्तू देऊन व त्यांना ओवाळून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या आठवणी स्मरणात राहील या साठी सुंदर असे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर मोटू पतलु व रिओ सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य के साई निरजा व पर्यवेक्षिका शबाना खान ,प्रणिता जोशी ,रेणुका सबाणे, वर्षा देशमुख, सारिका चिंचे, हर्षिता श्रीवास, वृषाली काळे, हर्षदा ठाकरे, पूजा मांडोकार, व सुप्रिया ढोपाटे यांनी अथक प्रयत्न केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close