Uncategorized
तहसीलदार यांची गोकुळसरा घाटावर कारवाई
नवप्रहार च्या बातमीचा दणका
माल लगेच सील न केल्याने कारवाई संशयाच्या भोवऱ्यात
कारवाई न झाल्यास नवप्रहार उचलणार मोठे पाऊल
जनता दिघी महल्ले घाटावर कारवाईच्या प्रतीक्षेत

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
तालुक्यातील गोकुळसरा घाटातून होणाऱ्या अवैध उपस्यावर काल रात्री तहसीलदार अभय घोरपडे यांनी कारवाई केल्याची विश्वसनिय माहिती असून कारवाई नंतर लगेच माल सील न केल्याने ही कारवाई शंकेच्या वलयात सापडली आहे. गोकुळसरा घाटावर कारवाई झाल्यावर जनता दिघी महल्ले घाटावर कारवाईच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यातील सगळ्याच अवैध घाटावर कारवाई न झाल्यास नवप्रहार मोठे पाउल उचलणार आहे.
तालुक्यातील अनेक घाटातून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे. असे असताना देखील काल विटाळा, बोरगाव धांदे घाटावर झालेली लहान कारवाई बघता कोणत्याच घाटावर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे सा. नवप्रहार ने या अवैध उपस्या वर प्रकाश टाकणे सुरू केले होते. आणि त्याचाच परिणाम म्हणून काल रात्री गोकुळसरा घाटावर कारवाई झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.
कालच वाळू साठा जप्त न केल्याने कारवाई शंकेच्या भोवऱ्यात – अत्यंत गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री तहसीलदार अभय घोरपडे यांनी वाळू घाटावर रेड टाकली असता त्याठिकाणी सेक्शन बोटीने वाळू काढण्यात येत असल्याचे सिद्ध झाले. जवळपास 200 ब्रॉस अवैध वाळू साठा होता. नियमानुसार तहसीलदारांनी तो साठा जप्त करणे आवश्यक होता. पण तसे न केल्याने ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जनता दिघी महल्ले घाटावर कारवाईच्या प्रतीक्षेत – गोकुळसरा घाटावर कारवाई झाली आहे. पण अवैध रेती साठा जप्त झाला नसल्याने ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. असे असले तरी जनतेला दिघी महल्ले घाटावर कारवाईची प्रतीक्षा आहे.




