क्राइम

49 वर्षाच्या व्यक्तीच्या मोबाईल मध्ये सापडले बाल लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आणि फोटो

Spread the love
सायबर पोलिसांनी केली अटक
मुंबई /क्राईम रिपोर्टर 
              महाराष्ट्र सायबर विभागाने कारवाई करत एका 49 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीच्या मोबाईल मध्ये 20 हजार बाल लैंगिक अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. मुंबईच्या मालाड पश्चिम येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफुद्दीन जामिर उद्दीन मलिक असं आरोपीचे नाव आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर केलेल्या देखरेखीदरम्यान एका व्यक्तीकडून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य डाउनलोड करून साठवले जात असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांना मिळालेल्या या माहितीच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञान आणि सायबर इंटेलिजन्स साधनांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर संशयिताची ओळख पटवली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीच्या मोबाइलची तपासणी केली असता त्यामध्ये अशा प्रकारचे २० हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळून आले. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने ते व्हिडिओ किंवा फोटो कोणत्या प्लॅटफॉर्मवरुन डाउनलोड केले होते. ते इतरही ठिकाणी प्रसारित करण्यात आले होते का? याचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे.

महिलांवरील आणि बालकांवरील ऑनलाइन गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सायबरने सायबर क्राइम प्रिव्हेन्शन अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन (सीसीपीडब्ल्यूसी), ऑनलाइन क्राइम अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन (ओसीडब्ल्यूसी) आणि टॅक्टिकल रिस्पॉन्स अगेन्स्ट चाइल्ड एक्स्प्लॉयटेशन (ट्रेस) अशी तीन विशेष पथके स्थापन केली. या पथकांनी 5.67 लाखांहून अधिक सायबर टिपलाइन अहवाल आणि बालकांच्या ऑनलाइन शोषणासंदर्भातील ३१ हजार तक्रारी हाताळल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close