क्राइम

नाशिक जिल्ह्यात ‘ ऑनर किलिंग ‘ भेटीसाठी बोलावून तरुणाला संपवले 

Spread the love

त्र्यंबकेश्वर / क्राईम रिपोर्टर

              नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे तरुणीच्या भावाकडून बहिणीच्या कथित प्रियकराला बातचीत करण्यासाठी बोलावून त्याच्यावर चाकूने सपासप वाट करून त्याची हत्या करण्यात आली आहे.

कुटुंबाच्या प्रतिष्ठेखातर घडलेल्या या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत तरुणीच्या भावाला अटक केली आहे. सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्ग रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ ही रक्तरंजित घटना घडली.

आर्यन सोमनाथ कांबळे (वय १८) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आदित्य एकनाथ मोंढे (वय २०, रा. शिरसगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. आरोपी आदित्य याने भेटायला बोलवून आर्यनची हत्या केली.भेटण्यासाठी बोलावून केला घात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आर्यन कांबळे आणि आरोपीची बहीण यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी आदित्य मोंढे याने आर्यनला आपल्या बहिणीसोबत असलेल्या संबंधांवरून चर्चा करण्यासाठी सापगाव येथील स्मशानभूमीजवळ बोलावून घेतले.
तिथे त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादादरम्यान राग अनावर झालेल्या आदित्य याने जवळ असलेला धारदार चाकू काढून आर्यनच्या पोटावर, गळ्यावर, हातावर आणि छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आर्यनला उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.एकाच समाजाचे असूनही ऑनर किलिंगचा बळी

विशेष म्हणजे मयत आर्यन आणि आरोपीची बहीण हे दोघेही एकाच समाजाचे होते, तरीही मुलीच्या कुटुंबाला हे नातं अमान्य होतं. प्रेमसंबंधामुळे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याच्या चुकीच्या समजुतीतून आणि रागातून मुलीच्या भावाचे आर्यनसोबत यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. अखेर याच रागातून आदित्यने आर्यनचा काटा काढत त्याची निर्घृण हत्या केली.

आरोपीला अटक; बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि आरोपी आदित्य मोंढे याला तातडीने ताब्यात घेतले. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये खूनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close