सामाजिक

बारावीच्या विद्यार्थिनीने स्वतःला शाळेतच पेटवून घेतले

Spread the love
 
विद्यार्थिनीकडे सापडली चार पानाची चिट्ठी 

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी 

          दिल्लीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील
 एका सरकारी शाळेत बारावीच्या विद्यार्थिनीनं स्वत:ला पेटवून घेत आयुष्य संपवलं. विद्यार्थिनीनं तिच्या सोबत एका बाटलीतून केमिकल किंवा पेट्रोल आणलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. विद्यार्थिनीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तिच्याकडे तीन पानांची चिठ्ठी सापडली आहे. मृत मुलगी १७ वर्षांची होती. तिच्या मृत्यूनं शाळेत खळबळ उडाली आहे.
शाहदरा जिल्ह्यातील कृष्णा नगरात ही घटना घडली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच क्राइम सीन टीम, अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. शाळेतील गार्ड रुमच्या मागे बारावीची विद्यार्थिनी जळालेल्या स्थितीत सापडली. प्राथमिक तपासाच्या दरम्यान विद्यार्थिनीच्या दप्तरातून काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी क्राइम टीमला पाचारण करण्यात आलं आहे. त्यांनी घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा नगरातील शाळेत एक विद्यार्थिनी जळालेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती पीसीआरला मिळाली होती. पोलिसांना घटनास्थळी विद्यार्थिनीच्या दप्तरासह काही वस्तू जप्त केल्या आहेत. पण याबद्दलचा तपशील पोलिसांनी दिलेला नाही.

सध्याच्या शाळेच्या परिसरात अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक उपस्थित आहे. विद्यार्थिनीनं कोणत्या परिस्थितीत स्वत:ला पेटवून घेतलं, याचा तपास केला जात आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीकडे तीन पानांची चिठ्ठी सापडली आहे. मृत तरुणी शाळेत येताना बाटलीमधून केमिकल घेऊन आली होती. पण पोलिसांनी या माहितीला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तरुणीकडे सापडलेल्या चिठ्ठीतील मजकुराबद्दल पोलिसांनी सध्या तरी गुप्तता बाळगली आहे.

घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे घटनाक्रमाचा अभ्यास केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिलेली नाही. विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल का उचललं आणि कोणत्या परिस्थितीत उचललं, याबद्दल पोलीस उपायुक्तांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. विद्यार्थिनीच्या अकस्मात मृत्यूमुळे शाळेत घबराट पसरली आहे. या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थी धास्तावले आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close