सामाजिक

मित्राचा अपघाती मृत्यू , महिला मित्राने उचलले टोकाचे पाऊल 

Spread the love
सातारा / विशेष प्रतिनिधी
            मैत्रीत एखादा मित्र मनाला इतका भावतो की त्याच्यासोबत निखळ मैत्रीचा एक अतूट धागा विणल्या जातो. पण मित्राने दगा दिला किंवा तो अन्य कोणासोबत मैत्री करून बसला तर मनावर त्याचा खोल आणि विपरीत परिणाम होतो. पण या घटनेत जे घडले आहे, त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
 साताऱ्यातून मन हेलावून टाकणारी वाईट घटना समोर आली आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात युवतीनं स्वत:ला संपवलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

काय आहे नेमकं प्रकरण?
पूजा माने असं युवतीचं नाव आहे. ती सातारा जिल्ह्यातीलच खटाव तालुक्यातील मानेवाडी येथील राहणारी होती. शिक्षणासाठी घरपासून दूर राहिलेली पूजा आपल्या भविष्याची स्वप्नं पाहत होती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

काही दिवसांपूर्वी पूजा आणि तिचा खास मित्र कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूजाच्या खास मित्राचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यांसमोर घडलेल्या या भयानक आघाताने पूजाला पूर्णपणे कोलमडून गेली होती.

धक्क्यातून सावरू शकली नाही
मित्राच्या अकाली जाण्याचं दुःख पूजाच्या मनावर इतकं भयंकर परिणाम करून गेलं की, ती या मानसिक धक्क्यातून बाहेर येऊ शकली नाही. सतत डोळ्यांसमोर येणारे त्या अपघाताचे प्रसंग आणि मित्राच्या विरहाची सल तिच्या मनाला कुरतडत होती. याच नैराश्यातून आणि तीव्र दुःखातून तिने सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अपघाताचा आघात आणि त्यानंतर विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याच्या कारणाची नोंद पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close