अपघात

हृदय पिळवटून टाकणारा अपघात,  एकाच कुटुंबातील सहा लोकांचा मृत्यू

Spread the love

मृतकांमध्ये तीन मुलांचा समावेश 

जळगाव / विशेष प्रतिनिधी 

              जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा लोकांचा मृत्यू झाला आहे.  मालदाभाडी गावाजवळ हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांमध्ये तीन बालकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्तामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close