विदेश

बंदुकधाऱ्यांकडून अंधाधुंद गोळीबार, 27 लोकांचा मृत्यू तर 15 जखमी 

Spread the love
 

जोहान्सबर्ग / विशेष प्रतिनिधी 

                       येथील पश्चिमेकडील एका बार मध्ये घुसलेल्या आठ बंदूकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याने 27 लोकांचा मृत्यू तर 15 लोकं जखमी झाले आहेत. हे आठही हल्लेखोर असॉल्ट रायफल ने सज्ज होते. गोळीबार केल्यानंतर त्यांनी काही लोकांची कथित झडती घेतली.आणि त्यांचे मोबाईल घेऊन पळ काढला. पोलिसांनी रविवारी या घटनेची माहिती दिली. गुन्हेगारीच्या घटनांनी त्रस्त असलेल्या दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झालेल्या हल्ल्याची ही ताजी घटना आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री सुमारे 7.30 वाजता ही घटना घडली. हल्लेखोरांनी बारमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर गोळीबार केल्यानंतर काही ग्राहकांची झडती घेतली आणि त्यांचे मोबाइल फोन घेऊन ते घटनास्थळावरून फरार झाले. हल्लेखोरांनी काही ग्राहकांची कथितपणे झडती घेतली आणि त्यांचे मोबाइल फोन घेऊन ओळख पटलेली नसलेल्या दोन वाहनांमधून घटनास्थळावरून पळ काढला.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 13 पुरुष आणि चार महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी दोन वाहनांना आग लावल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले असून हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी गुप्तहेर आणि इतर विशेष पथकांची मदत घेतली आहे.

केपटाऊनजवळही गोळीबार; 10 जणांचा मृत्यू

दरम्यान रविवारी पहाटे केपटाऊनच्या बाहेरील एका टाउनशिपमधील मनोरंजनाच्या ठिकाणी गोळीबाराची आणखी एक घटना घडली. या वेगळ्या घटनेत 10 जणांचा मृत्यू, तर 11 जण जखमी झाले.

दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडतात. देशात कायदेशीर तसेच बेकायदेशीर शस्त्रे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. टोळ्यांमधील संघर्ष आणि अनौपचारिक व्यवसायांमधील स्पर्धा यांचा अशा हिंसक घटनांशी अनेकदा संबंध असल्याचेही सांगितले जाते.

सुमारे 6.2 कोटी लोकसंख्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील हत्या दर जगातील सर्वाधिक असलेल्या देशांपैकी एक आहे. देशात दररोज सुमारे 60 जणांची हत्या होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close