भ्रष्टाचारभ्रष्ट्राचार

निलंबित DYSP च्या घरात सापडली कोट्यावधी ची रोकड , दागिने आणि जमिनीची कागदपत्रे

Spread the love

तेलंगणा / विशेष प्रतिनिधी 

आलिशान व्हिला… फ्लॅट्स… 50 एकरांहून अधिक जमीन… सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोकड…तुम्ही म्हणाल एखाद्या राजकीय व्यक्तीची किंवा बडा उद्योजकाची संपत्ती असेल.

त्यात काय एेवढं. थांबा ही संपत्ती आहे एका डीएसपीची. ती सेवेत असताना गैर मार्गाने कमविलेली आहे. आता या संपत्ती प्रकरणी एसीबीने या अधिकाऱ्यावर कारवाई केलीय. आता हा अधिकार कोण आहे. ही कारवाई कोणता राज्यात झालीय हे पाहुया…

तेलंगणामध्ये कारवाई झालीय. निलंबित डीएसपी भीम रेड्डी यांच्याशी संबंधित कथित बेनामी मालमत्तेच्या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने (ACB) मोठी कारवाई केलीय. डीएसपीशी संबंधित व्यक्तींच्या घरावरील छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड, विदेशी चलन, दारू आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आढळून आलीत. ACB गुरुवारी हैदराबाद आणि जहीराबाद परिसरातील दहा ठिकाणी छापेमारी केलीय. या कारवाईदरम्यान डीएसपी भीम रेड्डी यांच्याशी संबंधित आठ संशयिताच्या ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली आहे.

एका घरातून तब्बल एक कोटी रुपये जप्त
या कारवाईत बोम्मा व्यंकटेश यांच्या घरातून तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये रोख, विदेशी चलन आणि जवळपास 14 लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आलीय. जप्त करण्यात आलेल्या दारूबाबतची माहिती पुढील कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आली आहे.

30O कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचा तपास
यापूर्वी २ जुलै रोजी ACB ने १६ ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईत तपास यंत्रणेला कथितरित्या सुमारे 300 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. या मालमत्तेमध्ये आलिशान व्हिला, फ्लॅट्स, 50 एकरांहून अधिक जमीन, सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती समोर आली होती. या मालमत्तेचा नेमका स्रोत आणि त्यामध्ये डीएसपी भीम रेड्डी यांचा कथित सहभाग याचा तपास ACBकडून सुरू आहे.

 

जुलैमध्ये DSP भीम रेड्डी यांना अटक
तेलंगाणा पोलीस कॉम्प्युटर सर्व्हिसेसमध्ये (PCS) कार्यरत असलेले डीएसपी भीम रेड्डी यांना सहा जुलै रोजी ACB ने अटक केली होती. त्यांच्या हैदराबादमधील वेस्सेला मीडोज, इब्राहिमबाग येथील निवासस्थानी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटकमधील डीएसपी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित अनेक ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागलीय. दरम्यान, कथित बेनामी मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने ईडीकडूनही तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित मालमत्तांचे खरे मालक कोण, तसेच मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जात आहे. आता नव्या छापेमारीत सापडलेल्या 1 कोटी 35 लाखांच्या रोकडसह विदेशी चलन आणि इतर मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे या प्रकरणातील तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close