हटके

भाजीच्या गाठोड्यातून  निघाला कोब्रा 

Spread the love
 

डोंबिवली / विशेष प्रतिनिधी 

                     पावसाळ्याच्या दिवसात सरपटणारे प्राणी मोठ्या स्वरूपात बिळाच्या बाहेर येतात. मुख्यतः साप, या प्राण्यांना पाहून अनेकांना भीती वाटते. कल्याण पश्चिमेकडे आधारवाडी रोडवरील उंबर्डे डी बी चौकात एका महिलेने तिचे भाजीचे गाठोडे  उघडताच धावपळ माजली. कारण तिने आणलेला भाजीच्या गाठोड्यात भलामोठा किंग कोब्रा होता. काही काळ धावपळ माजल्यावर तेथे आलेल्या सर्पमित्राने कोब्रा सापाला पकडून सुरक्षित जंगलात सोडले. 

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी आली होती. भाजीचा गठ्ठा उघडताच त्यातून इंडियन कोब्रा जातीचा अत्यंत विषारी नाग बाहेर आला. हे पाहून महिला घाबरून दुकान सोडून मदतीसाठी याचना करू लागली.

याच दरम्यान परिसरातील दक्ष नागरिकांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना तातडीने फोन केला. माहिती मिळताच दत्ता बाँबे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत शिताफीने त्या कोब्रा नागाला पकडले.

विशेष म्हणजे त्या दिवशी आषाढी अमावस्या असल्याने चौकात नेहमीपेक्षा गर्दी होती. भर चौकात भाजीच्या दुकानात अचानक नाग आल्याने फेरीवाले, विक्रेते आणि खरेदीदार घाबरून गेले होते. काही वेळासाठी चौकातील व्यवहार ठप्प झाले होते .

मात्र साप पकडल्यानंतर चौकातील साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पकडलेला नाग इंडियन कोब्रा जातीचा असून अत्यंत विषारी आहे. कल्याण वन विभाग अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाजी आणि इतर साहित्य खरेदी/विक्री विक्रेत्यासह खरेदीदारांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन दत्ता बोंबे यांनी केले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close