क्राइम

राज्यात महिलांवर अत्याचाराचे सत्र सुरू असताना राळेगाव येथून हादरविणारी बातमी 

Spread the love
राज्यात महिलांवर अत्याचाराचे सत्र सुरू असताना राळेगाव येथून हादरविणारी बातमी 
राळेगाव ( यवतमाळ ) / विशेष प्रतिनिधी 
                राज्यात महिला / तरुणींवर अत्याचाराचे एका मागून एक समाज मन हादरहून टाकणारे आणि समाजाला चिंतेत टाकणारे प्रकार समोर येत असताना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून समाजाला विचारांनी चिंतेत टाकणारे प्रकरण उजेडात आले आहे. येथून एक नव्हे तर तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांना अन्य राज्यात वेश्यवृत्तीसाठी विकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे .

भाजपकडून आक्रमक इशारा

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमदार अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान यांनी तातडीने पोलीस प्रशासनाची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजप सातत्याने या प्रकरणावर लक्ष ठेवून होती. राळेगाव शहरात अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यात विकणे आणि मानवी तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. याबद्दल प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे,” असे मत प्रफुल्लसिंह चौहान यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी बन्सल आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप देखील पोलिसांकडे सुपूर्द केली आहे.

दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

या प्रकरणाची तीव्रता पाहता मंत्र्यांनी स्वतः राळेगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रकरणाचा आढावा घेतला. या तपासात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा सल्ला अशोक उईके यांनी दिला. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पीडित मुलींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महिला अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरले

दरम्यान सध्या राज्यात परतवाडा आणि नाशिक येथील आयटी कंपनीत महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राळेगावमधील हा प्रकार अधिकच संवेदनशील मानला जात आहे. या टोळ्यांचे जाळे राज्यभर पसरले आहे का? याचाही सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरत आहे. राज्यात घडत असलेल्या घटनेनंतर आता महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन याकडे कशाप्रकारे कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close