जागतिक

इस्त्रायल चा इराण च्या लहान मुलांच्या रुग्णालयावर हल्ला 

Spread the love

तेहरान – नवप्रहार डेस्क

                 इस्रायल चे इराण वर हल्ले सुरूच आहेत. नुकताच इस्त्रायल ने इराण च्या महात्मा गांधी रुग्णालयावर हल्ला केला आहे. या रुग्णालयात लहान मुलांवर उपचार केले जातात. इस्त्रायल च्या हल्ल्यामुळे रुग्णालयाचे प्रचंड नुकसान झाले असून रुग्णांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतरत्र हलविण्यात आले आहे.

इस्रायलनं हॉस्पिटलवर केलेल्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाले. भारतातील इराणी दूतावासाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तेहरान येथील महात्मा गांधी रुग्णालयातील नुकसान दाखवण्यात आले आहे. हे हॉस्पिटल लहान मुलांसाठी बनले होते. हवाई हल्ल्यानंतर हॉस्पिटलची दुरावस्था समोर आली आहे.

या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे की, इराणने युद्धात ११ देशांवर हल्ले केले परंतु त्यांनी कधीही हॉस्पिटल अथवा लहान मुलांना टार्गेट केले नाही. इराणमध्ये ६०० हून अधिक हॉस्पिटल आणि ६० पेक्षा जास्त शाळांवर अमेरिका-इस्रायलने मिसाइल हल्ले केल्याचा आरोप आहे. २ मार्च रोजी इस्रायलने हवाई हल्ला करत उत्तर तेहरानमधील महात्मा गांधी रुग्णालयाला टार्गेट केले. जागतिक आरोग्य संघटनेने याची पुष्टी केली. इस्रायलवर कायम हॉस्पिटलवर हल्ले करण्याचा आरोप लागला आहे. गाझावरील हल्ल्यातही इस्रायलने अनेक हॉस्पिटल टार्गेट केले. या हॉस्पिटलचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी केला जायचा असा इस्रायलचा दावा आहे. मात्र इराणमधील गांधी रुग्णालयावरील हल्ला अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी करण्यात आला.

इराणमधील विविध माध्यमांनी हॉस्पिटलच्या आतील व्हिडिओ फुटेज समोर आणले आहेत. ज्यात व्हिलचेअरजवळ मलबा विखुरलेल्या अवस्थेत दिसतो. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हॉस्पिटलचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर तातडीने तिथल्या रुग्णांना दुसरीकडे नेण्यात आले. हे हॉस्पिटल तेहरानच्या गांधी स्ट्रीटवर आहे. लहान मुलांचे हॉस्पिटल म्हणून ते ओळखले जाते. भारतासोबत विशेष नाते असल्याने या हॉस्पिटलचे नाव महात्मा गांधी ठेवण्यात आले होते. हे इराणमधील सर्वात मोठे खासगी रुग्णालय आहे.

दरम्यान, इराणमध्ये महात्मा गांधी यांच्या नावावर अनेक रस्ते आणि चौक आहेत. अत्याचाराविरोधात लढाई आणि मानवतेच्या दृष्टीने गांधींनी केलेला संघर्ष यासाठी सन्मान म्हणून इराणने ही नावे दिली आहेत. शांतता आणि अहिंसेच्या माध्यमातून साम्राज्यवादी शक्तींचा सामना महात्मा गांधी यांनी केला होता. त्यामुळे इराणमध्ये त्यांच्याविषयी आदर आहे. त्यातूनच इराणमध्ये २००८-०९ साली अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे नाव गांधींच्या नावावर ठेवले होते. परंतु इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात गांधी रुग्णालय उद्ध्वस्त झालेली इमारत बनवून राहिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close