जगाची धाकधुक वाढली , 5 जुलाई ला काय होणार ?.

जपान /. नवप्रहार इंटरनॅशनल ब्युरो
बल्गेरियन भविष्य वक्ता बाबा वेंगा यांनी सांगितलेली अनेक भाकित ही खरी ठरली आहेत. बाबा वेंगा प्रमाणेच जपान मधील भविष्य वक्ता रियो तुतूस्की हिचे देखील भाकीत खरे ठरतात. रियो तुतुस्की हिने 5 जुलै रोजी भयंकर घटना घडण्याची भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे आता यासाठी फक्त पाच दिवस शिल्लक असताना जगावर काय संकट येणार ? याला घेऊन जगात धडकी भरली आहे.
जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रियो तुतुस्की हे जपानी बाबा वेंगा म्हणून ओखळले जातात. जुलै महिन्यात महाप्रलय येणार असल्याची भविष्यवाणी या जापानी बाबा वेंगाने केली आहे. या जपानी बाबा वेंगाने भारतासाठीही धोक्याचा इशारा दिला आहे. जपानी बाबा वेंगाने केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी नेहमीच चर्चेत असते. यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. अशातच आता जपानी बाबा वेंच्या भविष्यवाणीमुळे संपूर्ण जग चिंतेत आले आहे.
5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये विनाशकारी आपत्ती येणार आहे. ही आपत्ती आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आपत्तींपेक्षा स्रवात भयानक असेल. जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राखाली एक दरी निर्माण होईल. यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतील. समुद्राता उसळणाऱ्या या लाटा 2011 च्या तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट विनाशकारी असू शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहे.
2011 मध्ये जपानमध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर जापमध्ये महाप्रलयकारी भूकंप आला होता. या त्सुनामीमध्ये हजारो लोकां मृत्यू झाला होता. या त्सुनामीमुळे फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले. 1986 मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या चेर्नोबिल अपघातानंतर हा सर्वात मोठा अणु अपघात होता. 5 जुलै 2025 रोजी यापेक्षा आणखी काही तरी भयानक घडू शकते असे भाकित जपानी बाबा वेंगाने केले आहे. फक्त जपानच नाही तर फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया देशांना या त्सुनामीचा मोठा फटका बसेल. भारतातही या त्सुनामीमुळे मोठा महाप्रलय येईल अशी देखील भिती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, 5 जुलै रोजी होणाऱ्या भविष्यवाणीमुळे जपानमध्ये खळबळ माजली आहे. या जबरदस्त फटका जपानच्या पर्यटनावर पडला आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजेंसच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जपानला जाणारी विमाने आणि हॉटेल बुकिंग, विशेषतः हाँगकाँगमधून, सुमारे 50 टक्के कमी झाले आहे. चीन, थायलंड आणि व्हिएतनाममधील बरेच लोक आता त्या तारखेच्या आसपास जपानला जाणारे त्यांचे प्रवास टाळत आहेत किंवा पुढे ढकलत असल्याचे बुकींगवरुन दिसत आहे.
रियो तुतुस्की यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 1995 मध्ये रियो तुतुस्कीने त्यांच्या डायरीत अनेक भाकिते लिहून ठेवली आहेत. 25 वर्षांनी, म्हणजे 2020 मध्ये, एक रहस्यमयी विषाणू जगात थैमान घालू शकतो. 2020 मध्ये जगात कोरोनाचा प्रकोप पहायला मिळाला. रियो तुतुस्की याने केलेली राजकुमारी डायनाचा मृत्यू, कोबे भूकंप आणि त्सुनामीबद्दलच्या भाकितेही खरी ठरली आहेत.