भागा..भागा… भागा…सिंघम दुम दबाकर भागा

चित्रपट आणि खाजगी जीवन. यात बरेच अंतर आहे. पण काही लोकं ग्लॅमरस दुनियेत वावरतात. आपण देखील एखाद्या चित्रपटातील हिरो पेक्षा कमी नाही असे त्यांना वाटते. असाच एक पीआय धाराशिव येथे होता. (होता यासाठी की आता तो ACB च्या ट्रॅप मध्ये अडकला आहे.) एका प्रकरणात त्याला लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पण त्याने त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो अपयशी ठरला. बाजीराव सिंघम म्हणून मिळवणाऱ्या मारुती शेळकेचा लाचखोरीचा हा प्रकार पुढे आल्याने धाराशिव पोलिसात एकच खळबळ माजली आहे.
काय आहे प्रकरण?
अजय देवगणचा सिंघम हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून धाराशीवरचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके आपण सिंघम असल्याचं सर्वांनासांगत होता. त्या कालावधीमध्ये त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या. पण, तरीही त्याची सिंघमगिरी कमी झाली नाही. तो प्रमोशन घेऊन धाराशिव जिल्ह्यातल्या ग्रामीण पोलीस स्टेशनमघ्ये पोलीस निरीत्रक म्हणून काम करु लागला.
शेळकेनं पोलीस दलातीलच सहकारी महिलेच्या मुलाला गुन्ह्यात न अडकवण्यासाठी 1 लाखांची लाच मागितली. त्यानं ही लाच त्याच्या सहकारी मुक्ता लोखंडेमार्फत स्वीकारली. ही कार्यवाही एसीबीच्या जाळ्यात अडकली. एसीबीनं कार्यालयात आणल्यानंतर मारुती शेळकेनं चोरासारखी कार्यालयातून धूम ठोकली.
कधीकाळी गुन्हेगाराच्या मागे सिंघम प्रमाणे धावणाऱ्या मारुती शेळकेला चोरासारखे तोंड लपवत पळावे लागले. फिल्मी स्टाईल याचा पाठलागही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला एक किलोमीटर अंतरावर त्याच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले. हा नाट्यमय थरार हा सीसीटीव्हीत कैद झाला असून लोकांनीही उघड्या डोळ्यांनी पाहिल्याची चर्चा होतेय. या प्रकाराबाबत आम्ही एसीबी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला
वाद आणि मारुती शेळके हे चांगलच जमलंय तो जिथे जाईल तिथं काही ना काही वाद झालाच आहे. त्याच्या अनेक तक्रारी पोलिस दरबारी देखील दाखल झाल्या आहेत. निष्पाप युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचं भविष्य उध्वस्त केल्याचेही समोर आले आहे. या पीडित युवकाने आता समोर येत त्याची व्यथा मांडली आहे.
लाच घेण हे पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना नवीन आहे अस नाही. सामान्य माणसाकडून नेहमीच लाच घेतल्याच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात. पण पोलीस खात्यातीलच अधिकाऱ्यांने पोलिस असलेल्या महिलेकडून तिच्या मुलाला वाचविण्यासाठी ही मागितलेली लाच म्हणजे आपल्या कर्तव्याशी व आपल्या ईमानाशी केलेली घोर प्रतारणाच म्हणावी लागेल.