शैक्षणिक

धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थी संगीत परीक्षेत उत्तीर्ण .

Spread the love

अभिजात कलोपासक मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

धामणगाव रेल्वे :/प्रतिनिधी 
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई तर्फे आयोजित विविध संगीत परीक्षेत धामणगावातील अभिजात संगीत कलोपासक मंडळाचा निकाल १०० टक्के जाहीर झाला आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याची आवड असणाऱ्यांसाठी धामणगाव येथील अभिजात संगीत कलोपासक मंडळ वरदान ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संगीत, गायन, वादन क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून चित्रपट सृष्टीत सुद्धा संगीतकार म्हणून नामांकन मिळविले आहे. अभिजात संगीत कलोपासक मंडळातर्फे या वर्षी सेवाग्राम परीक्षा केंद्रावरून ४८ विद्यार्थ्यांनी प्रवेशिका अर्ज दाखल केले होते. यापैकी प्रारंभिक गायन परीक्षेत २०, प्रवेशिका प्रथम मध्ये ११, प्रवेशिका पूर्ण साठी ०९, प्रारंभिक तबला वादन ०१, प्रवेशिका पूर्ण तबला वादन ०१, मध्यमा प्रथम ०१, मध्यमा पूर्ण ०१, विशारद प्रथम ०१ आणि विशारद पूर्ण साठी ०३ विद्यार्थ्यी परीक्षेत उत्तीर्ण झाले . यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन करून धामणगाव येथील संगीत क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण त्यांच्या दहावीच्या परीक्षेत शालेय अभ्यासक्रमात ग्राह्य धरण्यात येत असून अनेक विद्यार्थांना या गुणांचा लाभ मिळाला आहे. संगीत गायनात विद्यार्थी दरवर्षी विशारद पदवी प्राप्त करून भारतीय समाज मनावर अभिजात संगीताची गोडी वृध्दिंगत करीत असल्याचा आनंद सुखदायक आहे, असे मत अभिजात संगीत कलोपासक मंडळाचे संगीत मार्गदर्शक श्री. नारायण सुरंदसे यांनी व्यक्त केले आहे. समाजातील सर्व स्तरातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय पालक तथा संगीत मार्गदर्शक यांना देत आहेत .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close