क्राइम

दहशतवाद विरोधी पथकाकडून आणखी एका हेराला अटक 

Spread the love
वाराणसी / नवप्रहार ब्युरो

                  पहलगाम हल्ल्या नंतर सतर्क झालेल्या भारतीय सुरक्षा एजन्सी आणि पोलिस विभागाने पाकिस्तान साठी हेरगिरीं करणाऱ्या लोकांविरोधात मोहीम उघडले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. देशाच्या मिठाला हराम झालेले लोक हळूहळू पोलिसांच्या आणि सुरक्षा एजन्सी च्या रडारवर येऊ लागले आहेत. उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका व्यक्तीला पाकिस्तान साठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली.आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने एका निवेदनात म्हटले आहे की, “तुफैलने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना तहरीक-ए-लब्बैकचा नेता मौलाना शाह रिझवी याचे व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये ‘गजवा-ए-हिंद’, बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्याचे आणि भारतात शरिया कायदा लागू करण्याचे आवाहन करण्यात आले होते.” (operation Sindoor)

दहशवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की तुफैल कथितपणे राजघाट, नमो घाट, ज्ञानवापी, रेल्वे स्टेशन आणि लाल किल्ला यासारख्या संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना पाठवत होता.

निवेदनात असेही म्हटले आहे की, “तुफैलने पाकिस्तानद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सची लिंक वाराणसीतील इतर अनेक लोकांना पाठवली होती. याद्वारे पाकिस्तानी अधिकारी आणि स्थानिकांमध्ये संपर्क साधला जायचा. तो ६०० हून अधिक पाकिस्तानी क्रमांकांवर संपर्कात होता. तुफैल फेसबुकद्वारे पाकिस्तानातील फैसलाबाद येथील रहिवासी नफीसा नावाच्या महिलेशी संपर्कात होता, जिचा पती पाकिस्तानी सैन्यात आहे.”

भारत-पाकिस्तान सीमेवर एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या मदतीने तस्करीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती देणाऱ्याने असाही आरोप केला की, तो पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस साठी हेरगिरी करत होता आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close