आध्यात्मिक

राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी: अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध जनजागृतीचा संदेश

Spread the love

 

यवतमाळ: / प्रतिनिधी
अज्ञान,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जनजागृती करणारे महान समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त यवतमाळ येथील संत गाडगे महाराज चौकात विशेष अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी गाडगे महाराजांना आदरांजली वाहिली.कार्यक्रमादरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या,जसे की, “चोरी करू नका”, “व्यसनाच्या अधीन जाऊ नका”, “लहान वयात लग्न करू नका” आणि “राष्ट्रसंत गाडगे महाराज की जय”.कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड,शिवजयंती उत्सव समितीचे प्रा.सुनील कडू,माजी नगरसेवक प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख,किशोर चव्हाण,शशिकांत खडसे,संजय कोल्हे,बाळासाहेब गावंडे,प्रमोद फाळके,प्रफुल देशमुख,मामा देशमुख,डॉ. डी.के.मेश्राम,राजेंद्र बाहेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन मनवर, प्रा.पंढरी पाठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close