हटके

व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा

Spread the love

सोशल मीडियावर  जंगली प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. त्यात हिंस्त्र पशु मिळून एखाद्या मोठ्या प्राण्याची शिकार करतात. तर कधी कळपाने असलेले प्राणी सिंहा सारख्या प्राण्याला ठार मारतात. अनेक वेळा हिंस्त्र पशु परिस्थिती पाहून मागे वळतात. पण या व्हिडिओत जे पाहायला मिळाले त्यावर प्राणी अभ्यासकांचा ही विश्वास बसत नाहीये. चला तर जाणून घेऊ काय आहे व्हिडिओत.

धक्कादायक व्हायरल व्हिडिओ

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडिओमध्ये सुमारे डझनभर भयंकर मगरींच्या कळपामधून एक बिबट्या शिकारीच्या शोधात जातो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो त्यांचीच शिकार हिसकावताना दिसतो. यासाठी तो एका मगरीला आपल्या पंजाने मारतानाही दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे लोकांना धक्का बसला आहे. बिबट्याला एवढी हिंमत कशी आली, की तो डझनभर शिकारींमध्ये घुसण्यात यशस्वी झाला, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. व्हिडिओमध्ये एक पाणघोडा देखील दिसत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. झांबियातील लुआंगवा नॅशनल पार्कमधील वन्यजीव छायाचित्रकार स्टीफन क्रूसबर्ग यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्याचा हा व्हिडिओ Latest Sightings नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close