ब्रेकिंग न्यूज
बॉडीबिल्डर आशीष साखरकर ची एक्झिट
मुंबई / नवप्रहार वृत्तसेवा
देशाला अनेक स्पर्धा जिंकून देत देशाचे नाव रोशन करणारा मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन झाले आहे.तो मागील काही दिवसांपासून आजाराशी झुंज देत होता.
मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक खिताब आशिषनं आपल्या नावे केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आशिष आजाराशी झुंज देत होता. अखेर या आजारानंच आशिषचं निधन झालं. आशिष साखरकर म्हणजे, बॉडीबिल्डिंग जगतातलं एक मोठं नाव. आज आशिषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1