हटके

घरात मृत व्यक्तीवर सुरू होती अंतिम संस्काराची तयारी आणि कुटुंबीय बघत होते मॅच

Spread the love

              सोशल मिडियावर अस काही व्हायरल होत असत की त्याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. तुम्हाला काही करताना कोणी बघितले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गोड गैरसमज ठरू शकतो. कारण कोणता अँड्रॉइड मोबाईल काय रेकॉर्ड करून घेईल याचा नेम राहिलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत जे रेकॉर्ड झाले ते अकल्पनिय आहे.

आपल्याकडे कोणाचे निधन झाले की, सर्व घरावर शोककळा पसरते. एकीकडे आक्रोश सुरु असतो तर दुसरीकडे मृताचे नातेवाईक लवकर अंतिमसंस्कार व्हावेत म्हणून घाई करत असतात. सर्व मंडळी दु:खाने आक्रोश करत असतात आणि सगळीकडेच दुःखाचे वातावरण पसरलेले असते. कुटुंबियच काय तर शेजारी देखील दुःखात असतात.  मात्र घरातील व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाने केल्ले हे कृत्य मुळातच कोणी केले असावे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

एका धक्कदायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका व्यक्तीच्या अंतिम संस्काराची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे मात्र यावेळी घरातील सदस्य कोणताही शोक न करता चक्क टीव्हीवर फुटबॉल मॅच बघण्यात मग्न झाले आहेत. एवढेच काय तर ही मंडळी प्रोजेक्टरवर मोठ्या स्क्रीनवर ही मॅच बघत बसले आहेत आणि मुख्य म्हणजे यावेळी मृत माणसाचे ताबूतदेखील तिथे उपस्थित आहे. मृत व्यक्तिचे पार्थिव कॉफिनमध्ये ठेवण्यात आले होते. म्हणजेच अंत्यसंस्कारातून ब्रेक घेऊन उत्कंटावर्धक मॅच पाहण्यात सर्वजण बिझी होते. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि अनेकजण हे कृत्य पाहून थ्यक्क होत आहेत.

 

 

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @Vision Pais नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ही सर्वात विचित्र गोष्ट आहे जी तुम्ही आज पहाल….असे लिहिण्यात आले आहे. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close