सामाजिक

कारंजा(लाड)येथे बुद्ध जयंती निमित्त बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम उत्सहात संपन्न

Spread the love

 

डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्या तील कारंजा(लाड)तालुक्या तील स्थानिक रमाई कॉलनी कारंजा(लाड)येथे
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून वाशिम जिल्हास्तरीय प्रबोधनपर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने विविध जाती समूहांना एकत्रित करून बुद्ध जयंती साजरी करण्यात आली होती.कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.संगीताताई मोहड (राज्य सदस्य बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क)होत्या तर मा.दिनेश राऊत यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.प्रा.मोटघरे सर, प्रा.सेजव सर तसेच सुजाता महिला मंडळ रमाई कॉलनी कारंजा(लाड)यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले.मा. अर्चना ठोंबरे,मा.सुमेधा भगत मा. मायाताई मनवर,मा.सुजीत भगत मा.साहेबराव भगत,मा. भारत मनवर सर,मा.कळंबे सर, मा.गजानन वरघट,मा.सुनीता मनवर,मा.मोटघरे मॅडम,मा.शेजव मॅडम,मा.साहेबराव भगत यांनी बुद्धाचा वैभवशाली इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले मनोगत व्यक्त केले.बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला उदघाट्क म्हणून मा.सिद्धार्थ देवरे साहेब (मा.वनाधिकारी )हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मा.अतुल धनद्रव्य यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.सुमेध भगत यांनी केले तर आभार मा.प्रमोद देवळे (राज्य सदस्य बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क) यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close