हटके

पाच लाख लोकांच्या गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिल्या जाते तेव्हा 

Spread the love

इंदूर / नवप्रहार मिडिया 

                 आपल्या कडे एखाद्या वेळेस छोटेखानी कार्यक्रम असला तरी काही वेळेसाठी जमलेल्या गर्दीला सांभाळणे शक्य होत नाही. मग लाखोंची गर्दी सांभाळण्यात अधिकाऱ्यांना काय कसरत करावी लागते हे त्यांचे त्यांनाच  माहीत. पण इंदूर मध्ये जमलेल्या 5 लाख लोकांच्या गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला या गर्दीतून अगदी सहज रित्या वाट मोकळी करून दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला अत्यल्प कालावधीत लाखो लोकांनी पहिला आहे.

पाच लाखांच्या गर्दीत रुग्णवाहिका पोहोचली तेव्हा ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला. लाखोंच्या गर्दीतून वाट काढणे अवघड होते,मात्र लोकांच्या शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे रुग्णवाहिकेला ताबडतोब वाट करून दिली. अन् काही मिनिटात रुग्णवाहिका गर्दी मधून बाहेर पडली. जिथे नजर जाईल तिकडे नागरिक उभे होते. तेथे उपस्थित असलेल्या ५ लाखांच्या जमावाने शहाणपणा दाखवत रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा केला. या रॅलीदरम्यान रस्ता खचाखच भरलेला असतो.गर्दीत हजारो महिला पोलीस आणि पुरूष पोलीस बंदोबस्तसाठी तैनात केले जातात.

या गर्दीच्या प्रवासात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव स्वतः उपस्थित होते. या रंगपंचमी मिरवणुकीत रुग्णवाहिकेला रस्ता देण्याचा प्रसंग आल्यावर सर्वजण आपली मजा सोडून रुग्णवाहिकेला रस्ता देण्यात व्यस्त झाले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अंकित कुमार अवस्थी नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख १२ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तसेच लाइकही करण्यात आले आहे. यावर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close