दिनांक 29 जानेवारी पासून तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण
उपोषणाने प्रश्न न सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केल्या जाईल!….. नगरसेवक मंगेश काळे यांचा इशारा
अकोला. / प्रमोद मोहरील
स्थानिक तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची सात वर्षापासून दयनीय अवस्था असून या रस्त्याच्या खराबीमुळे अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत. तरीसुद्धा शासनाने हा रस्ता अडवून ठेवलेला आहे.या परिसरातील नागरिक या खड्ड्यामय रस्त्यामुळे त्रस्त झाले असून हा रस्ता व्हावा म्हणून नगरसेवक मंगेश भाऊ काळे मित्रमंडळाच्या वतीने शासन, प्रशासनास , जन प्रतिनिधी यांना पाच वेळा निवेदन दिले आहेत. तसेच अनेक वेळा आंदोलने केली आहेत. परंतु शासनाने आश्वासने देऊन आंदोलने संपवली परंतु तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याचे काम अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे नाईलाजने दिनांक 29 जानेवारी 2024 वार सोमवार पासून तुकाराम चौकात नगरसेवक मंगेश भाऊ काळे मित्र मंडळ व निर्भय बनो जण आंदोलनच्या वतीने मराठायोद्धा समाजसेवक व निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, तसेच नगरसेवक मंगेश भाऊ काळे मित्र मंडळाचे संयोजक प्रमोद धर्माळे हे या रस्ता , पाईपलाईन दुरुस्ती व स्ट्रीट लाईट ची कामे त्वरित व्हावे म्हणून आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या या उपोषणाला समर्थन म्हणून अनेक संघटनेचे पदाधिकारी साखळी उपोषण त्यांच्यासोबत करणार आहेत. याबाबतचे निवेदन महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अकोला यांना याबाबत निवेदन देऊन इशारा देण्यात आला आहे तरीही प्रशासन सुस्त झोपलेले असून या झोपलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना जागृत करण्या करीता दिनांक 29 जानेवारीला आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. तरी शासन प्रशासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन हा रस्ता व या रस्त्यावरील कामे त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलन या पेक्षा शिवसेना स्टाईलने तीव्र केल्या जाईल याची सर्वांश्री जबाबदारी शासनाची राहील असा इशारा नगरसेवक मंगेशभाऊ काळे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे. तशा पद्धतीने निवेदन वरील सर्व यंत्रनेला देण्यात आलेले आहे. तरी शासन यावर काय निर्णय घेते याकडे मलकापूर खडकी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. प्रकाशनार्थ……………………… माननीय ,संपादक/ पत्रकार साहेब अकोला