राजकिय

वाडीत युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Spread the love

वाडी(प्र):: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारेने प्रभावित होऊन वाडीतील अनेक युवकांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नागपूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात वाडीतील शंकरराव मेश्राम,रामसागर मेश्राम,आशिष मडके, सुरेश फुसे,प्रकाश शेंडे,इकबाल शेख,श्रीकांत लांडगे, टारजन चव्हाण,अक्षय वंजारी,यमन शाहू,अतुल डोहारे,धीरज मडके,रतन चनकापुरे,प्रज्वल मेश्राम, प्रतीक कुंभरे,सुमित चनकापुरे,सागर तागडे इत्यादींचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व काँग्रेसचा दुपट्टा घालून स्वागत केले.
यावेळी मंचावर नागपूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कोकाटे,जिल्हा महासचिव अनिल पाटील, युवक काँग्रेसचे राज्य सचिव अश्विन बैस, वाडी शहराध्यक्ष शैलेश थोराणे,महासचिव किशोर नागपूरकर,माजी उपनगराध्यक्ष राजेश थोराणे,सह भीमरावजी कांबळे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना तालुकाध्यक्ष प्रकाश कोकाटे यांनी सांगितले की,प्रवाहाच्या विरोधात जाऊन युवकांनी मर्दानगी दाखवत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला त्याबाबत सर्वांचे स्वागत केले. यावेळी अश्विन बैस, शैलेश थोराणे यांनीही समायोजित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विपीन डोंगरे,अनुप रामटेके अंबादास तिडके,योगेश कुमकुमार, पंडित भोरगडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शैलेश थोराणे तर आभार विपिन डोंगरे यांनी मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close