लीडरशिप कोच &ट्रेनर कु. दामिनी गोरडे यांचे पालकांना मंत्रमुग्ध करुन टाकणारे भव्य सेशन
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
गोरडे ग्रुप ऑफ एज्युकेशन च्या डायरेक्टर तसेच श्रीधर पाचघरे गुरुजी ज्ञानप्रबोधिनी पथ्रोट या नामांकित संस्थेचे संस्थापक सचिव डॉ श्रीकृष्ण गोरडे व संस्थाध्यक्षा सौ संगीता गोरडे यांची कन्या, *”मूर्ती लहान पण कीर्ती महान”* ही उपमा सुद्धा कमी पडेल अशा अतिशय कमी वयात पालक, शिक्षक, विद्यार्थी यांना मोटिव्हेशन करणाऱ्या कु. दामिनी गोरडे यांचे वृंदावन पॅलेस येथे त्यांच्याच संस्थेच्या शाखा सीतारामजी गणोरकर इंग्लिश स्कूल&ज्युनिअर कॉलेज पथ्रोट व बालशिवाजी इंग्लिश स्कूल अंजनगाव सुर्जी या दोन्हीही स्कूल मधिल पालकांच्या आग्रहास्तव सेशन घेण्यात आले सेशन चा मुख्य विषय होता “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात पालकांचा रोल”व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वकला कशी निर्माण करावी. या सेशन ला पालकांसोबतच पथ्रोट व अंजनगाव शहरातील प्रतिष्ठित मंडळी सुद्धा उपस्थित होती. दोन ते अडीच तास चालणाऱ्या या सेशन मधुन पालकांना आपल्या पाल्याला मोटिव्हेट करणाऱ्या खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या जे कधी पालकांना आपल्या पाल्याला घडवताना लक्षातच येत नाही.हे खुप काही दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन समजावून सांगितले आपल्या पाल्यावर आपल्या अपेक्षा व इच्छा न लादता आपल्या पाल्याला समजुन घेतले पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे इ.असंख्य गोष्टी शिकायला मिळाल्या.अतिशय हृदयस्पर्शी, मंत्रमुग्ध करुन टाकणारे पालकांच्या डोळ्यांना अश्रूधारा लावणारे अप्रतिम असे सेशन होते. ज्या सेशन करीता मेट्रोसिटी मध्ये पालकांना हजारोने पैसे द्यावे लागतात असे सेशन संस्थापक सचिव डॉ श्रीकृष्ण गोरडे यांनी आपल्या दोन्हीही स्कूल मधिल पालकांकरीता फ्री ऑफ कॉस्ट ठेवले जेणे करुन विद्यार्थी पालकांच्या इच्छा व अपेक्षा यामध्ये भरकटणार नाही व त्याला योग्य दिशा मिळेल. सेशनला खुप मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती. शेवटी पालकांनी मोटिव्हेशनल स्पीकर कु. दामिनी मॅम यांना धन्यवाद दिले आम्ही या सेशन मधुन खूप काही सोबत घेऊन चाललो व आमच्यात नक्कीच बदल घडवू असे अभिप्राय दिले व अशा प्रकारचे सेशन प्रत्येक स्कूल मध्ये व्हायला पाहिजे.म्हणजेच विद्यार्थी घडेल व आपल्या भारत देशाची पिढी खऱ्या अर्थाने घडेल.अशा प्रकारचे सेशन पालकांकरीता नेहमीच आयोजित करावे अशी इच्छा व्यक्त केली.या सेशन ला दोन्हीही स्कूल मधिल सर्व शिक्षक वर्ग उपस्थितीत होता व त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.