क्राइम

धक्कादायक …. तीन मुलांनी मिळून केली पित्याची हत्या

Spread the love
 
अलमोडा (उत्तराखंड ) / नवप्रहार मीडिया 
 

60 वर्षीय सुंदर लाल की कथित तौर पर दरांती से वार कर तथा लाठी से पीटकर हत्या कर दी गई।

अलमोडा जिल्ह्यातील लमगडा परिसरात वडिलांच्या कथित अवैध संबंधा मुळे संतापलेल्या तीन मुलांनी मित्राच्या मदतीने  वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलांच्या मते वडिलांचे अवैध संबंध होते तर वडीलांना मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध मंजूर नसल्याने आणि त्यांच्याकडून त्यांना आर्थिक मदत होत नसल्याने मोठ्या मुलीने आपल्या भावंड आणि मित्रासह वडिलांची हत्या केल्याचे समजते. लमगडा येथील ठाणेदारांनी दिलेल्या माहिती नुसार सुंदरलाल काही महिन्यापूर्वीच भारत टिबत (आईटीबीपी) मधून निवृत्त झाले होते.

               दिनेशनाथ यांनी दिलेल्या माहिती नुसार सेवानिवृत्त झाल्यावर सुंदरलाल (60) हे आपल्या मूळगावी भागादेवली येथे राहायला आले होते. पण त्यांची मोठी मुलगी डिंपल (25), मुलगा रितिक (21) आणि लहान अल्पवयीन मुलगी त्यांच्या डेहराडून येथील सरकारी बंगल्यातच राहत होते. घटनेच्या दिवशी हे तिघे आणि दिल्ली येथील संगम विहार येथील रहिवासी हर्षवर्धन याला घेऊन भागलादेवी येथे पोहचले. त्यांनी प्रथम सुंदरलाल यांच्या भावाच्या कुटुंबाला मारठोक करून घराबाहेर हाकलून दिले.
                        यानंतर काही वेळात घरातून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने गावकरी घटनास्थळावर आले असता त्यांना चार लोक पळून जातांना दिसले. त्यांनी घरात जाऊन खोली चे दार उघडले असता त्यांना सुंदरलाल मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी लगेच या बद्दल पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत अल्पवयीन मुलीला बालसुधार गृह आणि इतर तिघांना अटक केली. सुंदरलाल यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                  आरोपींना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की वडिलांचे अन्य महिले सोबत कथित अवैध संबंध असल्याने 2018 मध्ये मानसिक दडपणाखाली आईचा मृत्यू झाला होता.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close