धामणगाव शहरात विदर्भातील एकमेव दीक्षा व संथारा
समाधी मरण असा अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण
दि. 3/8/2023 ला दुपारी 12 वाजता
आचार्य 1008 श्री रामलालजी म.सा.के जैन शिष्य पूज्य श्री जयप्रभ मुनीजी म. सा व पूज्य श्री अनन्य मुनीजी म.सा यांच्या अथक प्रयत्नाने जैन सुश्रावक श्री शांतीलालजी मोतीलालजी छाजेड वय 89 यांना वैराग्य प्राप्त झाले होते. पूज्य श्री च्या मुखारवीदातून दिनांक 2/7/23 ला सकाळी 9 वाजता संथारा सल्ल्लेखाना दिल्या गेली . त्यानंतर श्री शांतीलालजी छाजेड यांचा दीक्षा भाव सुद्धा जागृत झाला असता आचार्य श्री रामलालजी महाराज यांच्या आज्ञेनुसार पूज्य श्री जयप्रभ मुनिजी म.सा. यांनी त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता जैन भगवती दीक्षा देण्याचे ठरविले त्यानुसार श्री शांतीलालजी छाजेड यांची त्यांच्या घरापासून धर्मयात्रा काढण्यात आली समाजातील व गावातील सर्व मान्यवर मंडळी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते पूज्य श्री जयप्रभ मुनिजी म.सा. यांच्या मुखर्विंदातून जैन भगवती दीक्षा प्रदान करण्यात आली व तसेच त्यांचे नवीन नामकरण होऊन त्यांना नवीन नाव उत्साह मुनिजी म.सा. ठेवण्यात आले तेव्हापासून दि.2/8/2023 पर्यंत रोज शेकडो दर्शनार्थी श्री जैन स्थानक येथे येऊन दर्शनाचा लाभ घेत होते आणि जैन स्थानक येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते .श्री शांतीलालजी छाजेड यांच्या परिवारामध्ये त्यांच्या धर्म पत्नी विमलदेवी शांतीलालजी छाजेड दोन मुलं तीन मुली एवढा मोठा परिवार आहे धामणगाव नगरवासीयान मध्ये धर्म प्रति उत्साह मुनीजी म.सा यांनी समाजामध्ये एक नवीन ऊर्जा स्तोत्र देऊन जैन नगरवासीयांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहे. दिनांक 3- 8 -23 रोजी त्यांना संथारा समाधी(पंडित मरण )प्राप्त झाले धामणगाव शहरातील जैन बांधव व धामणगाव नगरवासी व बाहेर गावा वरून हजारो लोकांनी दर्शनाचा लाभ घेऊन गौतम प्रसादी चा लाभ श्री छाजेड परिवार कडून श्री महावीर भवन येथे सर्वांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला