दर्यापूर ते पुणे बस सेवा सुरु करण्याची दर्यापूर वाशियांची मागणी
दर्यापूर / सूरज देशमुख
दर्यापूर ते पुणे बस सेवा सुरु करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे दर्यापूर ते पुणे बस सेवा सुरळीत झाल्याने दर्यापूर शहरातील बहुतांश विद्यार्थी व नातेवाईक हे पुणे येथे कर्तव्यावर असून त्यांना सणासुदीच्या काळात व इतर कौटुंबिक कार्यक्रमासाठी येणे जाणे करावे लागते त्यासाठी खात्रीशीर व विश्वासनीय प्रवास यासाठी महामंडळ हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे खाजगी वाहनांची संख्या अधिक असल्याने ग्राहक त्यावरती लगेच विश्वास संपादित करत नाही त्या कारणाने दर्यापूर ते पुणे बस सेवा सुरू व्हावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी व इतरांना सोयीचे होईल पुणे येथे जाण्याकरिता अकोला अमरावती मूर्तीजापुर येथे धाव घ्यावी लागते त्यामध्ये अधिक तान हा प्रवाशांना घ्यावा लागतो मौल्यवान वस्तू घरगुती वापरातील साहित्य अधिक असल्याने शेकडो रुपये प्रवास करण्यासाठी लागतात प्रवास सुखकर व सोयीस्कर होण्यासाठी दर्यापूर ते पुणे बस सेवा नियमित स्वरुपाची झाल्यास सर्व सामान्यांचा ताण पूर्णपणे कमी होईल असे जनमानसात बोलल्या जात आहे विद्यार्थी, शिकाऊ उमेदवार व नोकरदार यांनी बोलताना व्यक्त केले
सामान्य नागरीकांच्या सोयीचे होईल
दर्यापूर ते पुणे स्लीपर कोच बस सेवा सुरू होणे काळाची गरज आहे नोकरी व्यवसाय निमित्त तसेच शैक्षणिक कार्यासाठी दर्यापूर वरून बहुतांश मुले मुली नोकरदार वर्ग हे प्रवास करीत असतात त्यासाठी प्रवाशांना अमरावती अकोला यासह खाजगी बसेसने प्रवास करावा लागत आहे तो सर्वसामान्यांना परवडणारा नसून दर्यापूर ते पुणे महामंडळाची स्लीपर कोच बस असणे अति महत्त्वाचे आहे तरी शासनाने या अति गंभीर बाबीची शासन दरबारी दखल घेत बस सेवा सुरू करावी
संजय चोरपगार सामाजिक कार्यकर्ते
बस त्वरीत सुरु करावी – दर्यापूर पुणे बस सेवा दर्यापूर आगाराने त्वरित सुरू करावी. प्रवाशी उच्च शिक्षण घेणारे, नोकरदार वर्ग यांचे आर्थिक नुकसान होणार नाही यासह प्रवास सुखकर होण्यासाठी व सुरक्षित होण्यासाठी महामंडळ हाच एकमेव पर्याय आहे. दर्यापूर पुणे स्लीपर कोच दर्यापूर डेपोने सुरू करावी
अंकुश पाटील कावडकर
युवासेना उपजिल्हा प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमरावती
दर्यापूर ते पुणे स्लीपर कोच बससेवा ही काळाची गरज.. दर्यापूर येथून बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात आहेत. तसेच दर्यापूर निवासी अनेक नोकरदार सुद्धा पुण्यात कार्यरत आहेत. शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना नेहमीच पुण्यात जावं लागतं. काही विशेष आजार असणाऱ्या रुग्णांना तपासणी व उपचारासाठी जावें लागते. अशा परिस्थितीत सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी दर्यापूर पुणे स्लीपर कोच बससेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुखांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन सर्व सामान्य जास्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.
राजेंद्र वि. गायगोले
सेवानिवृत्त मुख्याध्यापक